माथेरानच्या पर्यटनाला बुस्टर डोस

कोरोनामुळे मागील वर्षी माथेरानमध्ये दीपावली हा सण पर्यटकांसोबत साधेपणाने साजरा केला गेला
matheran
matheransakal media

दीपावली म्हणजे दिव्यांचा सण, नकारात्मकता सोडून सकारात्मकतेकडे नेणारा सण. माथेरानमध्ये पर्यटनाचे तीन हंगाम असून दीपावली ही पावसाळ्यानंतरचे पहिले पर्व; तर नाताळ आणि एप्रिल आणि मे हे नंतरचे ९० दिवस आणखी दोन हंगाम. या तिन्हींमध्ये दीपावली सण पर्यटनासाठी खास मानला जातो.

matheran
माजी मंत्र्यांची जीभ घसरली; रागाच्या भरात शेतकऱ्याला दिली शिवी

कोरोनामुळे मागील वर्षी माथेरानमध्ये दीपावली हा सण पर्यटकांसोबत साधेपणाने साजरा केला गेला. लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला. यामध्ये माथेरानला तर मोठ्या प्रमाणात याची झळ सोसावी लागली. या गावात ना शेती, ना उद्योगधंदे. फक्त आणि फक्त पर्यटकांवर माथेरान अवलंबून आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे पर्यटनाला आत्ता कुठे चालना मिळू लागली आहे. त्यात दीपावली हा आनंदाचा सण म्हणून पर्यटकांना नैसर्गिक पर्यटनाची अनोखी भेट देण्यासाठी हा गाव सज्ज झाला आहे.

कोविडनंतर माथेरानच्या निसर्गात आमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळतो. जंगली प्राणी जंगलात बागडताना दिसत आहेत. यामध्ये रानडुक्कर, भेकर, शेकरू यांचा समावेश आहे. मात्र दीपावलीच्या सणात माथेरानच्या निसर्गात वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे स्वच्छंद बागडताना दिसत आहेत. हिरव्यागार वनस्पतींवर फुलपाखरे सर्वत्र दिसत आहेत. खऱ्या अर्थाने पर्यटकांना ही निसर्गाची दिवाळी भेट असणार आहे. नैसर्गिक अभ्यास करणाऱ्यांसाठी दीपावलीच्या दिवसांत अधिक महत्त्व आहे.

matheran
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या येथील स्थानिकांना या दीपावलीपासून आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी ऊर्जा मिळते. १९८० च्या दशकात येथे सेनेटोरियम होत्या. आज ही त्यातील काही सेनेटोरियम दिमाखात उभ्या आहेत. त्या वेळेस गुजरातहून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असायचे. सेनेटोरियमचे दर खूप स्वस्त असल्याने १० ते १५ दिवस गुजराती पर्यटक राहत होता. कडाक्याची थंडी, सर्वत्र घनदाट जंगल यामध्ये फाटक्यांची आतषबाजी न करता सर्व आप्तस्वकीय एकत्र येऊन घोड्याची रपेट करत. पर्यटन म्हणून दीपावली साजरी करत असायचे. माथेरानकरांना यांच्यापासून रोजगार मिळत होता. त्यातूनच माथेरानकरांची दिवाळी साजरी होत होती. आता काळ बदलला; पण माथेरानकरांची दीपावली भेट अजूनही तशाच पद्धतीची आहे.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गुजरातवरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते; मात्र हातावर मोजण्याइतक्या सेनेटोरियम असल्यामुळे आता पसंतीची हॉटेल्स आणि लॉजिंग उपलब्ध आहेत; मात्र अजूनही माथेरानकरांचा पर्यटकांविषयी आपलेपणाचा ओलावा अबाधित आहे.

"गेली सहा वर्षे दीपावलीमध्ये माथेरानलाच येतो. या काळात येथील थंड आणि शुद्ध हवामान मन प्रसन्न करते. विशेष म्हणजे फटाक्यांचा कर्कश आवाज येथे नसतो. येथील सर्व रहिवासी पर्यटकांमध्ये रमलेले दिसतात. यातून एक वेगळेपण दिसून येते. या दिवाळीच्या हंगामात निसर्गही आपली वेगळी छाप सोडत असतो. माथेरानला तिन्ही मोसमात आलो आहे; पण हिवाळ्यातील हे दीपावलीचे दिवस काही वेगळेच असतात."

- आशीष वंजारे, पर्यटक

"पावसानंतर माथेरानचा हा प्रमुख पर्यटन हंगाम. हा हंगाम १५ दिवस चालतो. या दिवाळीतील सुट्टी माथेरानमध्ये घालवणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसतील. गुजरातहून आलेले पर्यटक खूप दिवस राहतात. स्वच्छ वातावरणामुळे आपल्या परिवारासोबत मजेत दिवस घालवतात. त्यामुळे आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळते."

- सुनील राम शिंदे, स्थानिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com