कोरोनाची अशीही धास्ती; मुंबईहून येणाऱ्या रेल्वे, विमाने आमच्याकडे पाठवू नका...

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जुलै 2020

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून इतर भागात जाणाऱ्या लोकांमुळे त्या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून इतर भागात जाणाऱ्या लोकांमुळे त्या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रेल्वे तसेच विमाने आमच्या राज्यात पाठवू नका, असे पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे. अर्थातच विमानसेवा दोन आठवड्यासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे, तर ट्रेनची संख्या कमी करण्यात आली आहे.

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, दिल्ली, अहमदाबादहून कोलकत्त्यात विमानांची सेवा नको, असे पश्चिम बंगाल सरकारने केंद्रीय उड्डाण मंत्रालयास कळवले होते. त्यांनी या शहरांसह सूरत तसेच इंदूरहून कोलकत्त्यास जाणारी विमानसेवा 19 जुलैपर्यंत थांबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली तसेच तमिळनाडूतून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचा पश्चिम बंगाल सरकारचा दावा आहे. कोलकत्ताप्रमाणेच बागदोरा (सिलीगुडी) आणि आंदाल (दुर्गापूर) या पश्चिम बंगालमधील अन्य ठिकाणीही विमानांची सेवा मुंबई, दिल्लीसह अन्य शहरातून नको असेही सांगितले आहे. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

लॉकडाऊनपूर्वी कोलकता विमानतळावरुन दररोज दोनशे विमानांचे उड्डाण होत असे. देशातील विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय कोलकत्त्यातून 65 विमानांचे उड्डाण होईल, असे सांगितले होते. आता त्यात घट झाली आहे. पश्चिम बंगालला महाराष्ट्रातून येणारी विमानेच नको तर रेल्वेही बंद करण्याची सूचना केली आहे. 

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हावडा मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्याची सूचना केली आहे. ही ट्रेन सध्या रोज धावत आहे, मात्र पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीमुळे ती आता आठवड्यातून एकदाच असेल. अर्थातच तिकीटांचा परतावा लगेच सुरु करण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या ट्रेनना विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. श्रमिक स्पेशल सुरु झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या ट्रेनना परवानगी नाकारली होती. त्यांनी श्रमिक स्पेशलची कोरोना एक्सप्रेस म्हणून हेटाळणीही केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not allow flights and trains coming from mumbai, pune and other hotspot