esakal | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

best electricity.

बेस्टने टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना दिलेली वीजबिले ही मार्च महिन्याच्या वीजवापरावर आधारित आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या काळात साधारणपणे विजेचा वापर अधिक होतो. त्याचप्रमाणे लॉकडाऊनध्ये नागरिक घरी असल्यामुळे निवासी वीजवापरामध्ये वाढ झालेली आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : अनेक वीज कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजवापरावर अनिर्बंध आकारणी करून ती वसूल करण्याचा सपाटा लावत असताना, बेस्ट उपक्रमाने मात्र बिलापोटी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ग्राहकांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.

भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

वीज बिलापोटी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला असला तरी, ज्यांना सरासरी वापरावर दिलेल्या अंदाजित रकमेची बिले प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी रकमेची असल्यास, त्यांना बिलंबशुल्कासह (व्याजासह) तीन समान मासिक हप्त्यात रक्कम भरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.  

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

बेस्टने टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना दिलेली वीजबिले ही मार्च महिन्याच्या वीजवापरावर आधारित आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या काळात साधारणपणे विजेचा वापर अधिक होतो. त्याचप्रमाणे लॉकडाऊनध्ये नागरिक घरी असल्यामुळे निवासी वीजवापरामध्ये वाढ झालेली आहे. त्यावर आधारित अंदाजित बिले सादर करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष वीजमापन घेतल्यानंतर ज्या ग्राहकांना जास्त रकमेची बिले देण्यात आलेली आहेत, अशा ग्राहकांना त्यांची जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला आहे. ही रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना कमी रकमेची बिले देण्यात आली आहेत, त्यांना प्रत्यक्ष वापरावर आधारित बिले सादर करण्यात येणार आहेत.

हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

बेस्ट उपक्रमाने रेड झोन वगळता इतर भागात मीटर रिडींग करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष वापरावर वीजबिले आकारण्यास सुरुवात होणार आहे. बेस्ट उपक्रम जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करणार आहे. त्याचप्रमाणे ज्याना मार्च ते मे या तीन महिन्यात सरासरी तत्त्वावर दिलेल्या देयकापेक्षा दुप्पट वा अधिक देयक रक्कम आली असेल अशा ग्राहकांना व्याजासह तीन मासिक सुलभ हप्त्यात देयकाची रक्कम भरण्याची सवलत देण्यात येईल, असेही बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

बेस्टच्या या निर्णयामुळे अवास्तव वीजबिल आकारणीमुळे ग्राहक मेटाकुटीला येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कंपन्यांचे नुकसान झाले आहेच, पण लोकांचेही अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे ग्राहकही भरडला जाणार नाही आणि कंपनीचेही नुकसान होणार नाही असा मध्य बेस्ट उपक्रमाने साधला आहे. त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

loading image