
मुंबई: वीज ग्राहकांच्या तक्रारींवर निर्णय देण्यासाठी असलेल्या वीज ग्राहक गाऱ्हाणे मंचाच्या अध्यक्षपदी निवृत्त अभियंत्याची नियुक्ती करू नये, अशी विनंती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर तर्फे करण्यात आली आहे.
वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ग्राहक गाऱ्हाणे मंच यंत्रणा उभी केली आहे. या मंचावर अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायाधिश अथवा जिल्हाधिकारी किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. अन्य दोन सदस्यांत एक ग्राहक प्रतिनिधी व एक वीज वितरण कंपनीचा प्रतिनिधी असतो.
या संदर्भात नवे नियम सुचवले असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे मंचाच्या अध्यक्षपदी वीज वितरण कंपनीचा निवृत्त अभियंता असावा हा आहे. मात्र हा अध्यक्ष दूरान्वयानेही वीज वितरण कंपनीचा असता कामा नये. तो पूर्णपणे स्वतंत्र व नि:पक्षपातीच असावा अशी महाराष्ट्र चेंबर या वीज ग्राहक शिखर संस्थेची भूमिका असून त्यांनी या तरतूदीला विरोध दाखविला आहे.
यातील इतर तरतूदींवर चेंबरच्या उर्जा समितीने विचार केला आहे. नवीन जोडणी देणे, वीज खंडीत केली अशा तक्रारींवर पंधरा दिवसांत निर्णय द्यावा. इतर बाबतीत मंचाने 60 दिवसात निर्णय द्यावा अशा तरतूदी आहेत. तथापी वीज खंडित झाल्यावर वीजपुरवठा त्वरित सुरु होणे ही सर्वांचीच गरज असल्याने याबाबतचे निर्णय पाच दिवसांत द्यावेत, अशीही मागणी चेंबरने केली आहे. इतर बाबतीत कमाल तीस दिवसात निर्णय मंचाने द्यावा अशीही मागणी चेंबरने केली आहे.
वीज वितरण कंपनीचा निवृत्त अभियंता अध्यक्ष झाल्यास ग्राहक वाऱ्यावर सोडले जातील अशी भीती असल्याने प्रत्येक वीज ग्राहकाने या बदलास प्रखर विरोध करावा असे आवाहनही मंचाने केले आहे.
do not appoint retired engineer as president of Electricity Consumer Complaint Forum
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.