esakal | अन्नदाता शेतकऱ्याला दहशतवादी म्हणता?, संजय राऊत मोदी सरकारवर संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नदाता शेतकऱ्याला दहशतवादी म्हणता?, संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला.

अन्नदाता शेतकऱ्याला दहशतवादी म्हणता?, संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या चार दिवसांपासून पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु ठेवलं आहे. रविवारीही हजारो शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं. केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. यावरुन संजय राऊतांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तसंच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी अत्यंत शांततापूर्ण आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा जगालाही शेतकऱ्यांनी आदर्श घालून दिला आहे. मात्र या शेतकऱ्यांवर केंद्रातील मोदी सरकारकडून बळाचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करायला ते काय अतिरेकी आहेत का?, असा सवाल राऊतांनी मोदी सरकारला विचारला आहे. 

अधिक वाचा-  व्याजाच्या पैशांसाठी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

तसंच शेतकऱ्यांपेक्षा चीनवर बळाचा वापर केला असता तर चिनी सैन्य लडाखमध्ये घुसलं नसतं, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सर्वांनीच समर्थन दिलं पाहिजे. इतकंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर सर्वात आधी समर्थन केलं पाहिजे. मोदींनी शेतकऱ्यांशी तिथे जाऊन चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग आज दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे, असंही राऊत पुढे म्हणालेत. 

Do you call food farmer terrorist Sanjay Raut angry with Modi government

loading image