esakal | तुमच्याकडे वाहन आहे? मग ही बातमी वाचाच 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेक वाहन कंपन्या आपल्या ग्राहकांच्या मदतीला धावून आल्या आहेत.

तुमच्याकडे वाहन आहे? मग ही बातमी वाचाच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तुम्ही कार वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांची काळजी घेण्यासाठी सरसावल्या आहेत. अनेक वाहन कंपन्या आपल्या ग्राहकांच्या मदतीला धावून आल्या आहेत. प्रत्येक कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणि मोहीम आणली आहे. कोणती वाहन कंपनी ग्राहकांसाठी काय करणार आहे याची माहिती खालील प्रमाणे... 

हेही वाचा... तुमचा पगार 30 हजारपेक्षा कमी आहे, मग ही बातमी तुमच्यासाठी 
 

निसान मोटर इंडिया 
निसान मोटर इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सूक्ष्मजीवविरोधी निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली आहे. 
या उपक्रमांतर्गत ग्राहकांचा सतत संपर्क येईल, असा गाडीचा बाह्यभाग आणि अंतर्भाग, जसे की गाडीच्या दरवाजांचे हॅंडल्स, स्टीअरिंग व्हील, गीअर नॉब्ज अशा सर्व भागांचे सूक्ष्मजीव निर्जंतुकीकरण निसानच्या सर्व डीलर्सच्या माध्यमातून विनामूल्य केले जाणार आहे. या व्यतिरिक्त एसी डक्‍ट सिस्टिम, कार्पेट आदी भाग निर्जंतुक करणाऱ्या इंटिरिअर फॉगिंग ट्रीटमेंटचा वापर करून वाहनाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण, तसेच स्प्रेइंगच्या माध्यमातून बाह्य भागाचे निर्जंतुकीकरण करणारी सेवाही किफायतशीर दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. 15 मे ते 30 जून या कालावधीत होणाऱ्या वी सॅनिटाइज टु प्रोटेक्‍ट यू या शिबिरांतर्गत निसान आणि डॅट्‌सनच्या ग्राहकांना डीलरकडून फोन, ई-मेल आणि एसएसएस आदी माध्यमातून निमंत्रण प्राप्त होईल. ग्राहकांना या शिबिराच्या माध्यमातून विशेष सूक्ष्मजीवविरोधी निर्जंतुकीकरण सेवेचा लाभ घेता येईल. लॉकडाउनच्या काळात गाडीची देखभाल करण्यासंदर्भात निसान आपल्या सर्व ग्राहकांना वेबसाइट, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करत आहे. 

हेही वाचा...मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण 

वॉल्वो कार इंडिया 
सुरक्षेत अग्रेसर आणि लोकांना सुरक्षित ठेवण्याचे आपले वचन जपत वॉल्वो कार इंडियाच्या वतीने #SafestPlaceToBeया अभिनव ग्राहककेंद्री पद्धतीचा अंगीकार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून सर्व वॉल्वो विक्रेता सुविधा केंद्रे निर्जंतुक करण्यात आली आहेत. संपूर्ण देशात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना पीपीई आणि सनिटायरर्सचा देण्यात आली आहेत. विक्रेत्यांकडे असणाऱ्या गाड्या आणि नमुना म्हणून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या डेमॉन्स्ट्रेशन कार्स 3 एम सोबत निर्जंतुक करण्यात येणार आहेत. या टाळेबंदीच्या कालावधीत ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी खालील एक्‍स्पर्ट सोल्यूशन्स देऊ करण्यात येत आहेत: 


व्हील्सआय 
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ट्रक मालकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित असलेल्या व्हील्सआय या हायपर ग्रोथ स्टार्सअपने ट्रक मालिक सहाय्यता केंद्राची सुरुवात केली आहे. या ऑनलाइन पोर्टलद्वारे ट्रकचालकांना महत्त्वाच्या बातम्या तसेच ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीसंबंधी धोरणात्मक घोषणांची माहिती देण्याचा कंपनीचा हेतू आहे. या क्षेत्रातील लोकांना येणाऱ्या ईएमआयविषयक अडचणी, अन्न व निवा-याच्या समस्या, अफवांवर आळा घालणे, उद्योगपूरक धोरणांबद्दल जागरुकता निर्माण करणे यासारख्या अडचणी सोडवून या उद्योगाला आधार देणे, ही यामागील संकल्पना आहे. महामार्गांवर अडकलेल्या ट्रक मालक आणि चालकांना ऑनलाइन पोर्टलवरून भारतभरातील जवळपासच्या शासकीय अधिकृत व खाजगी अन्न व निवारा केंद्रांचाही शोध घेता येईल. ब्रॅंडने देशभरातील हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर ट्रक चालकांना अन्न व निवासाची व्यवस्था पुरवली आहे. अनिवार्य लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकृत जवळचे मेंटेनन्स वर्कशॉप व दुरूस्ती केंद्रही या पोर्टलवरून शोधता येईल. मुख्य जम्पस्टार्ट डिव्हाइस पॅकेजसह यूझर टोइंग, गॅस फिल, फ्लॅट टायरची दुरूस्ती, प्रेशर वॉटर क्‍लीनिंग आणि ऑइल, ल्यूब्रिकंट, कूलंट इत्यादीसाठी टॉप अप सेवांचा लाभ घेता येईल. 

ड्रूमद्वारे घरपोच वाहन दुरुस्ती सेवा 
लॉकडाऊन संपल्यावर आपले वाहन सुरु करताना मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी भारतातील सर्वात मोठा आणि अग्रेसर ऑनलाइन ऑटोमोबाइल ट्रान्सपोर्ट मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी जम्पस्टार्ट-ऑटोकेअर नावाची एक अनोखी घरपोच सेवा सुरू केली आहे. या सेवेत टायर्सची देखभाल, महत्त्वाच्या भागांची तपासणी, ऑइल व लुब्रिकंट टॉप अपसह वाहनांच्या जम्पस्टार्टचा समावेश आहे. यात मुख्य जम्पस्टार्ट डिव्हाइस पॅकेजसह यूझर टोइंग, गॅस फिल, फ्लॅट टायरची दुरूस्ती, प्रेशर वॉटर क्‍लीनिंग आणि ऑइल, ल्यूब्रिकंट, कूलंट इत्यादीसाठी टॉप अप सेवांचा लाभ घेता येईल. ग्राहक आपल्या सोयीनुसार, टाइम स्लॉट निवडू शकतात आणि पेमेंटची हमी देऊन नंतरही पेमेंट करू शकतकात. त्यानंतर ड्रूम हे काम करण्यासाठी एक इको-निंजा किंवा तंत्रज्ञ नियुक्त करते. हा तंत्रज्ञ सर्व्हिसिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्राहकाला इको जम्प स्टार्ट रिपोर्ट देतो. ग्राहक ऐनवेळी तंत्रज्ञाला निश्‍चित केलेल्या पॅकेजमध्ये आणखी अतिरिक्त सेवा देण्यासही सांगू शकतो. 

loading image