Kaali Peeli: ‘काली-पिली’ च्या नावामागे आहे खास कारण! नाव-रंग-रूपाचं आहे थेट राजा-महाराजांशी कनेक्शन..

कधी विचार केलाय का टॅक्सीचा रंग काळा-पिवळा का असतो?
Kaali Peeli
Kaali Peelisakal

मुंबईतील जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता काळी पिवळी 'पद्मिनी टॅक्सी'सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरुन गायब होणार आहे. आजपासून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही. पाच दहशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे.

परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झाली होती. पद्मिनी टॅक्सीची सुरूवात 1964 साली झाली होती. या टॅक्सीचे उत्पादन 2001 साली बंद करण्यात आले आहे.

जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे. ओला, उबर सारखे पर्याय आले तरीही आपल्याला आजही मोठ्या प्रमाणावर नेहमीच्या टॅक्सी आणि रिक्षा दिसतात. पण या सगळ्यात एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आली असेल. ती म्हणजे टॅक्सीला कायम असणारे पिवळा आणि काळा हेच दोन रंग.

हे असेच रंग टॅक्सीला देण्यामागे काही कारण असेल का असा प्रश्न कदाचित आपल्याला आजवर पडलाही नसेल. पण तुम्हाला माहित आहे का सार्वजनिक वाहनांना विशिष्ट रंग दिले जाण्यामागे काही कारणं असतात. टॅक्सी नेहमी काळ्या-पिवळ्या रंगाचीच का असते यामागचं कारण जाणून घेऊ.

Kaali Peeli
Kaali Peeli: मुंबईच्या रस्त्यांवरुन प्रसिद्ध 'काली-पीली' होणार गायब; सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक

मुंबईमध्ये १९१० नंतरच्या काळात सार्वजनिक वापरासाठी गाड्यांना परवानगी दिली. अर्थात टॅक्सीस सुरवात झाली. सुरवातीच्या काळातल्या टॅक्सी म्हणजे मर्सडिज, फोर्ड किंवा त्या कंपन्याच्या दुय्यम प्रकारच्या गाड्या. वरती असणाऱ्या टपाच्या ऐवजी साधे कापड असायचे.

वाहतुकीच्या ताफ्यात हळुहळु चांगल्या दिसणाऱ्या राजेशाही गाड्या येत गेल्या. चांगल्या दिसणाऱ्या फोर्ड, ब्युक सारख्या कंपन्यांच्या गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीचे काम करायच्या. 

राजे महाराजे जिवाची मुंबई करायला देशविदेशातून मुंबईत येवू लागले. तेव्हा सगळ्या गाड्यांना एकच कलर द्यायचे आणि तो म्हणजे ब्लॅक. 

त्याचा परिणाम असा झाला गाड्यांमधला लोकांना फरक कळत नव्हता. म्हणजे रस्त्यावरुन टाटांची गाडी चालली काय किंवा एखाद्या राजा महाराजांची माणसाची गाडी चालली काय हात दाखवून लोकं गाडी थांबवण्याचं ध्येयधोरण राबवायचे.

राजा लोक अशा वेळी गाडी पुढे घेवून जायचं काम करत नव्हते. तर राजाची गाडी बऱ्याचदा थांबायची. मग त्यांचे रक्षक टाईप लोक हुज्जत घालायचे.

हे पिवळं फडकं दिसलं की समोरुन येणारी गाडी ही टॅक्सी असल्याची खूण लोकांना कळू लागली. हा निर्णय नेमका कोणी घेतला हे सांगण अवघड आहे. संपुर्ण मुंबईत एकएक करत अशा पिवळं फडक बांधलेल्या टॅक्सी वाढू लागल्या. 

मुंबईकरांना नवी ओळख मिळाली पण ती देखील तात्पुरती. त्यानंतर ब्रिटीश शासनाच्या ताब्यात असतानाचा टॅक्सीच्या समोर असणाऱ्या पिवळ्या फडक्याला पिवळा रंग थापण्यात आला. त्यानंतरच्या दिवसांपासून ऑफिशियल टॅक्सी काळी पिवळी झाली. 

हा रंग अगदी दुरूनही लोकांना चटकन आकर्षित करेल म्हणून टॅक्सीला विचारपूर्वक रंग देण्यात आला. अगदी रस्त्यावर कमी उजेड असला तरी पिवळा रंग पटकन दिसतो. म्हणून काळ्या-पिवळ्या रंगाच्या टॅक्सीकडे लोकांची नजर पटकन जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com