धक्कादायक! डॉक्टरच कोरोनाबाधित, उपचार घेणाऱ्या नागरिकांमध्ये भीती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका खासगी डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडून उपचार घेणारे घाटकोपर पश्चिमेकडील जगदुशा नगर भागातील अनेक जण भयभीत झाले आहेत.

मुंबई : जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका खासगी डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडून उपचार घेणारे घाटकोपर पश्चिमेकडील जगदुशा नगर भागातील अनेक जण भयभीत झाले आहेत. दरम्यान, महापालिकेचे पथक आठ दिवसांत या भागात फिरकले नसल्याचे समजते. 

मोठी बातमी डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

घाटकोपर पश्चिमेकडील जगदुशा नगर येथील या डॉक्टरचा सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतो. कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले; मात्र या डॉक्टरने रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य सुरूच ठेवले होते. या दवाखान्यात कुर्ला, मुलुंड येथील रुग्णही उपचारासाठी येत होते. 

हे ही वाचातुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

गेल्या शनिवारी कोरोनासदृश लक्षणे वाटल्याने या डॉक्टरची चाचणी घेण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मुलाने त्याला सोमवारी ठाणे येथील एका रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. परिसरातील अनेक रहिवाशांनी या डॉक्टरकडून उपचार घेतले आहेत. त्यामुळे ही कुटुंबे भयभीत झाली आहेत. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा : धक्कादायक ! ऑफिसने दिलेल्या इंटरनेट डोंगलचा घरात सुरु आहे 'असा' वापर 

कुटुंबीय क्वारंटाईन
या डॉक्टरची पत्नी व डॉक्टर असलेल्या मुलाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे निवासस्थान असलेली जगदुशा नगरमधील इमारत 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

doctor is corona positive, paitent is in tention, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor is corona positive, paitent is in tention, read full story