

Doctors Protest
ESakal
महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून राज्यव्यापी अनिश्चित काळासाठी संपाची हाक दिली आहे. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्या आवाहनावरून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील २ लाखांहून अधिक ॲलोपॅथिक डॉक्टर सहभागी झाले आहेत.