कोरोनाविजेत्यांनो, तुम्ही कोरोनाला हरवलं; आता 'इथे' करा प्लाझ्मा दान....

भाग्यश्री भुवड
Saturday, 11 July 2020

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून सध्या प्लाझ्मा गोळा करण्याचे काम महापालिका युद्ध पातळीवर करत आहे. मात्र या मोहिमेला फारसं यश येताना दिसत नाही. कारण, मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

मुंबई : कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी हा चांगला पर्याय ठरत आहे. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या  रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. अशातच नेमक्या कोणत्या अधिकृत रुग्णालयात प्लाझ्मा दान करायचा असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र प्रशासनाने प्लाझ्मा दान करण्यासाठी रुग्णालयाची नावे जाहीर केली आहे. मुंबईतील पालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि सेव्हन हिल या चार रुग्णालयात, तसेच राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातही अधिकृतरित्या प्लाझ्मा दान करता येणार आहे. 

कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून सध्या प्लाझ्मा गोळा करण्याचे काम महापालिका युद्ध पातळीवर करत आहे. मात्र या मोहिमेला फारसं यश येताना दिसत नाही. कारण, मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मुंबई मुंबईत आतापर्यंत फक्त 1 टक्का म्हणजेच 100 कोरोनामुक्त रूग्ण आणि कोरोना वॉरियर्सने प्लाझ्मा दान केला आहे. हे प्रमाण वाढावं म्हणून पालिका रुग्णालयातील डॉक्टर्स कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क करत आहेत. मात्र, असेही काही रुग्ण आहेत जे बरे होऊन घरी परतले असून त्यांना प्लाझ्मा दान करायचा आहे. पण, नेमका कुठे करता येईल या प्रश्नामुळे अनेक जण रुग्णालयांपर्यंत पोहचू शकत नाहीत. 

कोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

मुंबईच्या सर्वच पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना वर उपचार केले जातात. मात्र, प्लाझ्मा दान करण्यासाठी काही मोजक्याच रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, या पाच प्रमुख आणि अधिकृत रुग्णालयांमध्ये प्लाझा दान करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. 

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

केईएम, नायर, सायन, सेव्हन हिल आणि जे जे रुग्णालयात कोरोनामुक्त रूग्ण जाऊन प्लाझ्मा दान करु शकतात. 23 सरकारी आणि पालिकेच्या 4 रुग्णालयांत जाऊन प्लाझ्मा दान करता येणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात प्लाझ्मा दान करता येऊ शकणार आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी रुग्णांना डॉक्टर्स आणि रक्तपेढ्याही संपर्क करत आहेत. रुग्ण स्वतःहून ही दान करण्यासाठी येत आहे. हे आजारातून बरे झालेले रुग्ण आहेत त्यामुळे, त्यांना सावरायला थोडा वेळ जाईल. शिवाय, त्यांच्या इच्छेवर हे दान अवलंबून आहे. नायरमध्ये काही दिवसांपूर्वी 50 हून अधिक रुग्णांनी प्लाझ्मा दान केला आहे. 
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय आणि प्रमुख, पालिका रुग्णालय

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors requested corona free patients to donate plazma