मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा सवाल

आजच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच ठाकरे आणि नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाले असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा सवाल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत काही सवाल उपस्थित केले आहेत. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनीषा वायकर यांचे देखील जमिनीच्या ७/१२ वर नाव आहे. त्यामुळे सोमय्या यांनी या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी बुधवारीही पत्रकार परिषद घेतली होती. 

आजच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच ठाकरे आणि नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाले असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी रेवदंडामध्ये जमीन कशासाठी घेतली? असंही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला आहे.

अधिक वाचा-  बाजारपेठांमधली गर्दी पाहून दिवाळीत पालिकेसमोर कोविड रोखण्याचे आव्हान

तसंच रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर व्यवहारासाठी एकत्र का आलेत?, असा प्रश्नही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय?, असंही ते म्हणालेत.

अधिक वाचा-  न्यूज रुममध्ये पोहोचल्यावर अर्णब गोस्वामींकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान

तसंच उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे का, असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. जमिनीमध्ये एवढी गुंतवणूक का कशासाठी केली? असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

कालच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते किरीट सोमय्या

किरीट सोमय्या म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि या जमीन व्यवहाराचा काही संबंध तर नाही ना? वैयक्तिक कारणामुळे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का ? असा गंभीर सवाल सोमय्या यांनी विचारला. हा जमीन व्यवहार नक्की काय आहे, हे महाराष्ट्राची जनता विचारतेय असं सोमय्या म्हणाले होते.

Does the Chief Minister have a real estate business Kirit Somaiya question

loading image
go to top