

Bhiwandi Building Collapse Rescue Operation
ESakal
संजय भोईर
भिवंडी : आईच्या मायेपुढे संकटही हतबल ठरते, याचा प्रत्यय भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत आला. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या आपल्या पिल्लाला पाहताच एका श्वानाने जीवाची पर्वा न करता त्याला जबड्यात अलगद उचलले आणि सुरक्षितस्थळी धाव घेतली.