Dombivali Crime : देहविक्री व्यवसायाचा हेदुटने गावात पर्दाफाश; 5 दलालांसह घर मालकाला अटक

बांग्लादेशमधून महिलांना फुस लावून त्यांना डोंबिवली येथे आणून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जात असल्याची बाब मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
Crime
Crimesakal

डोंबिवली - बांग्लादेशमधून महिलांना फुस लावून त्यांना डोंबिवली येथे आणून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जात असल्याची बाब मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पुणे येथील सामाजिक संस्थेकडे प्राप्त माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग ठाणे आणि मानपाडा पोलीस यांनी हेदुटने गावात छापा टाकला असता ही बाब उघड झाली आहे.

यात पोलिसांनी 5 दलालांसह हा व्यापार चालविण्यासाठी घर देणाऱ्या घर मालकाला अटक केली आहे. या 6 जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

बांग्लादेश येथील महिलांना भारतात त्वचेवरील उपचार, नोकरी लावून देणे या बहाण्याने आणले जाऊन नंतर त्यांना देहविक्री व्यवसायात अडकविले जात असल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पुणे येथील फ्रीडम फर्म या संस्थेच्या कार्यलयास 5 ऑक्टोबर रोजी बांग्लादेशमधून एक ईमेल आला.

या ईमेल मध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहान्याने बांग्लादेश हून भारतात आणले आहे. ती मुलगी डोंबिवलीत असून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ठाणे येथे येऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागास याची माहिती दिली.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांही स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ योगेश काळण यांच्या घरावर छापा टाकला. या घराच्या तळमजल्यावर पिडीत महीला व तिच्यासोबत इतर 6 बांगलादेशी महीला पोलिसांना मिळून आल्या.

पोलिसांनी महिलांकडे चौकशी केली असता दलालांचा म्होरक्या युनुस शेख उर्फ राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व महीलांना नोकरीचे व उपचाराचे अमिष दाखवुन बांगलादेशातुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे गांवामध्ये डांबुन ठेवले. तसेच या महिलांना जबरदस्ती देहविक्री व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती मिळाली. त्याबदल्यात राणा व त्याचे साथीदार लोकांकडुन पैसे घेत असल्याचे सर्व महीलांनी पोलीसांना सांगितले.

राणा व त्याचे साथीदार पलावा सिटी मध्ये असल्याचे पोलीसांना पिडीत महीलांनी सांगितल्या नंतर पोलीसांनी पलावा सिटी मध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले. आरोपींना पोलीसांचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेवुन अंतर्ली गावाबाहेर असलेल्या झाडी झुडपामध्ये पळुन गेले.

झाडीमध्ये अंधार असल्यामुळे तसेच आरोपीची संख्या जास्त असल्यामुळे पोलीसांनी आणखी मनुष्यबळ व टॉर्च मागवुन रात्री 2 ते पहाटे 6 दरम्यान आरोपींचा झाडीझुडपामध्ये शोध घेवुन 5 जणांना अटक केली. युनूस अखमल शेख उर्फ राणा, (वय 40), साहिल मिजापुर शेख (वय 26 ), फिरदोस नुर हुसेन सरदार (वय 24), आयुबअली अजगरअली शेख (वय 35), बिपलॉप हापीजूर खान (वय 24) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यातील मुख्य आरोपी युनुस शेख याने या महिलांसाठी हेदुटने येथे घर भाड्याने घेतले. युसूफ याच्या सांगणेवरून कोणत्याही वैध कागदपत्र व करार नाम्याशिवाय स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घर उपलब्ध करून देणारा घर मालक योगेश काळण (वय 31) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही भाडेकरूला घर देताना पोलीस ठाण्याचे एनओसीसह भाडेकरूचे पदस्तावेज तपासून घर भाड्याने देण्यात यावे असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

यातील एका महिलेला उपचाराच्या नावाखाली भारतात आणण्यात आले होते. सदर महिला तिच्या पती सोबत भारतात आली होती. तिच्या पतीला नंतर वेगवेगळी कारणे देऊन पुन्हा बांग्लादेशात एकट्याला पाठविण्यात आले होते. व महिलेला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले असल्याची माहिती देखील पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com