esakal | डोंबिवली : हेदुटणे गावाजवळ कोसळलेले होर्डिंग धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : हेदुटणे गावाजवळ कोसळलेले होर्डिंग धोकादायक

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली (Kalyan-Dombivali) आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वाऱ्याच्या जोरामुळे झाडे पडून अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यातच बदलापूर पाईपलाईन (pipeline) रोडवर मोठे जाहिरातीचे होर्डिंग (Hording) कोसळले असून ते धोकादायक स्थितीत आहे. दोन दिवस हे होर्डिंग तेथे लटकलेल्या अवस्थेत आहे. वादळी वारा पुन्हा सुटल्यास ते विजेच्या तारांवर किंवा रस्त्यावर कोसळून नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असून ते होर्डिंग हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने कल्याण परिसर, ग्रामीण भागातील जनता दोन दिवस अंधारात होती. पावसाळ्यात झाडे कोसळणे, रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरातीचे मोठे होर्डिंग कोसळणे यांसारख्या घटना घडत असतात. यामुळे पावसाळ्यापूर्वी असे जाहिरातीचे होर्डिंग हटविण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच पावसामुळे कल्याण शीळ रोडवरील 4 होर्डिंग पडले होते. यातील एका घटनेत 2 जण जखमी देखील झाले होते.

हेही वाचा: IPL 2021: ऐतिहासिक दिवस! एकाच वेळी चार संघ उतरणार मैदानात

बदलापूर पाईपलाईन रोडवरील खाली झुकलेला एक होर्डिंग सध्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. हेदुटने गावाजवळील जाहिरातीचे हे होर्डिंग एमआयडीसीच्या जलवाहिनीवर पडले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तो कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वादळीवारा पुन्हा सुटल्यास हे होर्डिंग उडून बाजूच्या विजेच्या तारांवर किंवा रस्त्यावरील वाहनांवर धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तो तत्काळ हटवावा किंवा संबंधित कंत्राटदाराने त्याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

loading image
go to top