Dombivali : उघड्यावर जाळला जातो कचरा; प्रदूषणाला आळा कसा बसणार

उल्हासनगर, बदलापूर सह कल्याण डोंबिवलीतील प्रदुषणात देखील वाढ झाली आहे.
dombivali
dombivalisakal

डोंबिवली - शहरात सुरु असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे यामुळे वायू प्रदुषणात भर पडलेली असताना त्यात कचऱ्याच्या धूराची देखील भर पडत आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात पालिका कर्मचाऱ्यांकडून उघड्यावर कचरा जाळण्यात येत असून त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत टाकण्यात येणारा राडारोडा आणि तेथेच कचऱ्याला लावली जाणारी आग यामुळे वायू प्रदुषणात वाढ होत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

उल्हासनगर, बदलापूर सह कल्याण डोंबिवलीतील प्रदुषणात देखील वाढ झाली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला यासोबतच घसा बसणे, दुखणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची सिमेंट कॉंक्रीटीकरणची कामे सुरु आहेत, दुसरीकडे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाने खड्डात खडी टाकून ते भरले होते. पावसाने उघडीप देताच ही खडी सुकून ती रस्त्यावर पसरल्याने उडणाऱ्या धुरळ्याने हवेतील प्रदुषणात भर पडली.

dombivali
Air India: शिंदे सरकारने एअर इंडियाची इमारत घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

एकीकडे प्रदुषण कमी करण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेकडे पालिका प्रशासन उपाय योजना करत असताना दुसरीकडे ग्रामीण परिसर, चाळ वस्ती याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात रस्त्याच्या कडेलाच शहरातील राडारोडा खाली करण्यात आला आहे. चाळ परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळेस या रोड्याच्या बाजूला घरातील कचरा आणून टाकत आहेत. सकाळी रस्ता झाल्यानंतर त्यातून गोळा होणारा कचरा तसेच नागरिकांनी आणून टाकलेला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे कर्मचारी उघड्यावर जाळत आहेत. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात भरच पडत आहे.

dombivali
Mumbai Pune: मुंबईला जाताय? 'एक्सप्रेस वे' वर उद्या तब्बल ६ तास राहणार ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते जाणून घ्या

या धुरामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच बाजूलाच चाळीत राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. येथे कचरा जाळण्याऐवजी तो घंटागाडीत उचलून टाकावा, आधीच येथील मोकळ्या जागेत बांधकामाचा राडारोडा टाकण्यात येत असल्याने मातीमिश्रीत धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असते. त्यात या धूराचा त्रास नागरिक सहन करत आहेत. प्रदुषण कमी करण्यासाठी एकीकडे पालिका प्रशासन उपाययोजना करत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने कचरा जाळण्यात येत असेल तर प्रदुषणाला आळा कसा बसणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com