mumbai pune express way
mumbai pune express way

Mumbai Pune: मुंबईला जाताय? 'एक्सप्रेस वे' वर उद्या तब्बल ६ तास राहणार ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम चिखले ब्रिज येथे गुरुवारी (ता. ९) ११ ते ५ वाजेपर्यंत केले जाणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची वाहने, हलकी व जड-अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते आहे?

- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई लेन पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावर करंजाडेमार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईला येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com