Dombivali News : मांगीलाल मोरे यांच्या अपघाती मृत्यूमागे महापालिकेच्या पथदिव्यांची केबल; महावितरणने दिले स्पष्टीकरण

डोंबिवलीतील कोपर रोड भागातील सिद्धार्थनगर येथील घराच्या जिन्यात वीजप्रवाह उतरल्याने मंगळवारी रात्री मांगीलाल मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Street Light Cable
Street Light CableSakal

डोंबिवली - डोंबिवलीतील कोपर रोड भागातील सिद्धार्थनगर येथील घराच्या जिन्यात वीजप्रवाह उतरल्याने मंगळवारी रात्री मांगीलाल मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पथदिव्यांसाठीची केबल लोखंडी जिन्याला चिकटल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातात महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

मंगळवारी रात्री सुमारे 10 च्या दरम्यान महावितरणचे तंत्रज्ञ संदिप घोरपडे यांना घटनेची माहिती देणारा दुरध्वनी आला. माहिती मिळाल्यानंतर घोरपडे तातडीने घटनास्थळी पोहचले. घोरपडे यांनी टेस्टरच्या मदतीने तपासणी केली असता मोरे यांच्या घराकडे जाणाऱ्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह आढळून आला. घोरपडे यांनी वरिष्ठांना यासंदर्भात माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संबंधित भागाच्या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला.

Street Light Cable
Sanjay Raut : धमकी प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक; आरोपी आमदार सुनील राऊतांचा निकटवर्ती?

या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करूनही मोरे यांच्या घराकडे जाणाऱ्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह सुरूच असल्याचे आढळले. त्यामुळे सिद्धार्थनगर परिसरातील पथदिव्याला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतरच लोखंडी जिन्यात उतरलेला वीजप्रवाह खंडित झाला. अधिक तपासणी केली असता पथदिव्याच्या दोन खांबांमधील सिंगल फेज टू केबल आणि जीआय केबल लोखंडी जिन्याच्या लोखंडी पाईपला चिकटलेली आढळली. या फेज केबलचे इन्सुलेशन निघालेले होते व पाईपला स्पार्किंगच्या खुणाही आढळून आल्या आहेत.

कोपर रोड शाखेच्या सहायक अभियंत्यानी या अपघाताबाबत ठाणे 2 च्या विद्युत निरिक्षकांना माहिती कळवली. त्यानुसार विद्युत निरिक्षकांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालातून अपघातामागील कारणांचा उलगडा होईल असे देखील महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com