Dombivali News : दंड थकविणाऱ्या 69 बेशिस्त रिक्षाचालकांचे लागले फलक ;दंड भरा अन्यथा कायदेशीर कारवाई

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बेशिस्त रिक्षा चालकांवर डोंबिवली उप वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते.
mumbai
mumbaisakal

डोंबिवली - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. ई चलान डिव्हाईस तसेच सीसीटीव्ही च्या माध्यमातून रिक्षाचालकांना दंड ठोठावला जातो. मात्र रिक्षाचालक या दंडाकडे कानाडोळा करत असून दंड भरण्यास जात नाहीत.

10 हजारांवर दंडाची रक्कम गेलेल्या रिक्षाचालकांकडून दंड वसुली करण्यासाठी आता वाहतूक विभागाने वेगळी शक्कल लढवली आहे. शहरातील चौकात या रिक्षांचे नंबर जाहीर करणारे फलक लावण्यात आले असून दंड भरा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा सज्जड दमच भरला आहे.

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बेशिस्त रिक्षा चालकांवर डोंबिवली उप वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. सध्याच्या घडीला सीसीटीव्ही कॅमेरे, ई चलान माध्यमातून कारवाई केली जात आहे.

यात चलान लावल्याचा संदेश येतो मात्र त्वरित हे पैसे भरण्याची सक्ती नसते. वाहतूक नियम मोडणाऱ्या दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. नियम मोडल्याने येणारे अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम तसेच तेवढे पैसे ही जवळ नसल्याने अनेक रिक्षाचालक ही रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात.

mumbai
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

परिणामी ही रक्कम वाढत जाऊन काही रिक्षाचकांवर 10 हजार पेक्षा अधिक दंडाची रक्कम जमा झाली आहे. यात डोंबिवली पूर्वेतील 44 व पश्चिमेतील 25 रिक्षाचालकांचा समावेश आहे. या बेशिस्त रिक्षा चालकांनी एकूण 11 लाख 28 हजार रुपयांची दंडाची रक्कम थकवली आहे. वारंवार या चालकांना कळवुनही ते थकीत रक्कम भरणा करत नसल्याने वाहतूक आणि उपप्रादेशिक विभागाने या रिक्षा चालकांच्या नंबरचे फलक लावत

mumbai
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

जाहीर इशारा देऊ केला आहे.

या रिक्षा चालकांनी तातडीने आपली दंडाची रक्कम वाहतूक विभागाकडे जमा केली नाही तर या 69 रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. अशा रिक्षा चालकाचे परमिट, नामपट्टी (बॅच), नुतनीकरण, नोंदणीकरण रद्द करण्याचा अधिकार आरटीओ विभागाला आहे. या नियमाने ही कारवाई केली जाणार आहे.

उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उपविभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com