डोंबिवली : ग्रामस्थांना धमकावून डम्पिंग गावात आणल्यास विरोध

14 गावातील संतप्त ग्रामस्थांचा सत्ताधारी प्रशासनाला इशारा
दिवा डम्पिंग
दिवा डम्पिंगSakal

डोंबिवली : ठाणे महापालिकेने (Thane Corporation) दिवा डम्पिंग हटवून तो कचरा भंडार्ली येथे भाडे तत्वावर घेतलेल्या जागेवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने जागाही ताब्यात घेतली असून त्याचा करारनामा झाला आहे. ठाण्याचा कचरा 14 गावात आणून टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध असून सत्ताधारी ग्रामस्थांना धमकावून जागा ताब्यात घेतल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी रविवारी पार पडलेल्या बैठकीत एकमताने केला. ग्रामस्थांचा विरोध असतानाही कचरा गाड्या गावात आणल्यास वेशीवरच या गाड्या रोखल्या जातील, यावेळी ग्रामस्थांचा रोष देखील सत्ताधाऱ्यांना दिसेल असा इशारा सभेत 14 गावातील ग्रामस्थांनी सत्ताधारी प्रशासनाला दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेने 14 गावांतील मौजे भंडार्ली येथे डम्पिंग ग्राऊंड मंजूर केले आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. ठाणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचा तसेच आयुक्त, महापौर, विरोधीपक्ष नेते व गावातील काही विरोधक मंडळी यांच्या निषेधाचे फलक गावागावात लावण्यात आले आहेत. रविवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, समितीचे लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर येंदालकर, विजय पाटील, नामदेव पाटील, गुरुनाथ पाटील, समाजसेविका चित्रा बाविस्कर यांसह ग्रामस्थ, सर्व पक्षाचे प्रतिनिधी, पंचायत सदस्य उपस्थित होते.

दिवा डम्पिंग
MHADA परीक्षेप्रकरणी तिघांना अटक; अमिताभ गुप्तांचा मोठा खुलासा

दिवक डम्पिंग हटविण्यासाठी भंडार्ली येथील जागा डम्पिंगसाठी भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आणि त्यास पहिल्यापासूनच 14 गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. तग्रामस्थांचा विरोध न जुमानता सत्ताधारी काही ग्रामस्थांना धमकावून त्यांना प्रलोभन दाखवून हा प्रस्ताव मंजूर देखील करून घेतला आहे. कचऱ्याच्या घंटागाड्या कधीही गावात दाखल होतील त्याला विरोध दर्शविण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरून गाड्या रोखतील, आंदोलन करतील. तसेच ग्रामस्थांना धमकावून त्यांच्या माथी कचरा टाकू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आमचा रोष देखील दिसेल असा इशारा ग्रामस्थांनी बैठकीत ठाणे महापालिकेतील सत्ताधारी प्रशासनाला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com