

Crime News
ESakal
डोंबिवली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापाच्या भरात झोपेत असलेल्या पत्नी व चार अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या पित्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यात नऊ वर्षांचा मुलगा प्रणवचा जागीच मृत्यू झाला होता. साडेबारा वर्षांनंतर हा निकाल लागला आहे.