

Dombivli Crime Train Accident
ESakal
डोंबिवली : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका अल्पवयीन तरुणीचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना सर्वसाधारण अपघात असल्याचा तर्क लावला जात होता. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर सदर घटनेतील मृत तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असून ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे.