

Election Controversy In Dombivli As Cash Distribution Video Goes Viral
Esakal
राज्यात २९ महानगरपालिकांची निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना डोंबिवलीत धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. प्रचारावेळी मतदारांना तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात आहेत असा आरोप करण्यात येतोय. भाजप उमेदवारांकडून तुकाराम नगर परिसरातल्या दशरथ भुवन इथं पैसे वाटण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवाराने केलाय.