esakal | डोंबिवली बलात्कार प्रकरण उर्वरित 9 आरोपींनाही न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली बलात्कार प्रकरण ! उर्वरित 9 आरोपींनाही न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali) अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील उर्वरित 9 आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन (Court) कोठडी सुनावली आहे. 22 आरोपींना सोमवारीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये 34 व्या आरोपीचा शोध पोलीस (Police) घेत असून त्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

हेही वाचा: Mumbai : सहा वर्षांत बेस्टच्या सर्व बस इलेक्ट्रिक!

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात 33 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सर्व आरोपींना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मानपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आधारवाडी कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक 34 वा आरोपी असून तो अद्याप फरार आहे. पोलिसांची तीन पथके फरार आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

loading image
go to top