
मुलाला वाचवायला गेले अन्...; एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाचा घाला
मुंबई : मुंबईत डोंबिवलीमध्ये तलावात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीमधील संदप गावात ही घटना घडली असून सर्व मृतांना आग्मिशामक दलाच्या जवानांना बाहेर काढले आहे. एका कुटुंबातील सर्वजण तळ्यात कपडे धुण्यासाठी गेले असल्याची माहिकी ग्रामस्थांनी सांगितली आहे.
(5 Family Death by Drowning Lake )
गावामध्ये पाण्याची टंचाई असल्याने एकाच कुटुंबातील सर्व लोक तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेले असताना एक मुलगा पाण्यात बुडाला होता. त्याला वाचवण्यासाठी एका महिलेने पाण्यात उडी घेतली आणि तीही बुडू लागली. त्यानंतर तीला वाचवण्यासाठी एक एक करत पाच जणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि आपला जीव गमावला आहे. मृतांमध्ये मीरा गायकवाड (५५), सून अपेक्षा (३०), नातू मयुरेश (१५), मोक्ष (१३) आणि निलेश (१५) यांचा सामावेश असून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, एक महिला आणि तीची सून तलावाच्या कडेला कपडे धूत असताना एक मुलगा तलावात बुडू लागल्याने त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या, परत त्यांना वाचवायला गेलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. पाण्यात गेलेल्या सर्व पाच जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून आग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांचे मृतदेह उशिरा पाण्यातून काढण्यात आले आहेत. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती ग्रामस्थांकडून घेण्यात येत असून अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.