Airport : विमातळावर 'डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक' सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाने 'डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक' नवीन सुविधा सुरू केली आहे.
 Mumbai Airport
Mumbai Airport esakal
Summary

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाने 'डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक' नवीन सुविधा सुरू केली आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाने 'डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक' नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे टर्मिनल दोनवरून देशांतर्गत उड्डाणे जोडणार्‍या टर्मिनस एक वर विमान प्रवाशांना सहज जाता येणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक मुंबई विमातळ आहे. दिवसेंदिवस मुंबई विमानतळांची प्रवासी संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या प्रवासाचा सोयीस्कर आणि त्रासमुक्त करण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ वरुन टर्मिनल १ वर प्रवाशांना आता डायरेक्ट जाता येणार आहे.

मुंबई विमानतळावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढत असल्याने नवीन डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक (डीटीडी) अशी नवीन सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना सहज प्रवास करता यावा यासाठी सुरक्षा तपासणीमधील जागा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या हस्तांतरणासाठी किमान कनेक्शन टाइम (एमसीटी) कमी करेल. ज्यामुळे प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाइटसकरिता सहज प्रवास करता येईल. तसेच प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com