'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश

तुषार सोनवणे
Wednesday, 9 September 2020

कंगनाच्या या मुद्यावर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या पक्षाच्या प्रवक्यांसाठी आदेश जारी केले आहेत.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं तिला वाय प्लस सुरक्षा दिला आहे. मुंबई विमानतळावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.  कंगनासाठी शिवसेनेचा विरोध कायम आहे. विमानतळावर शिवसेनेचे कार्यकर्ते कंगनाविरोधात घोषणाबाजी करत आहे. कंगनाला मुंबईत फिरु देणार नसल्याच्या घोषणा शिवसैनिक विमानतळावर देताहेत. तर दुसरीकडे रिपांईचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. कंगना आपल्या खार येथील घरी पोहोचली आहे. परंतु या मुद्यावर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या पक्षाच्या प्रवक्यांसाठी आदेश जारी केले आहेत.

कंगना राणावत मुंबईतल्या घरी दाखल, विमानतळावर आरपीआय-शिवसेना भिडली

कंगनाच्या कार्यालयाच्या  बेकायदा बांधकामाप्रकरणी कुठेही बोलू नका असे आदेश सेना नेतृत्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. कंगनाला जास्त महत्व देऊ नका तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, तिच्या ट्वीटवर प्रतिक्रीया देऊ नका त्यावर विधानं करू नयेत अशी ताकीद मातोश्रीवरून देण्यात आल्याचे कळते.

रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या ३ पत्रकारांना रायगडमध्ये अटक, मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न

दरम्यान, कंगना पाकिस्तान चले जाव, कंगना राणावत हाय हाय अशा घोषणा शिवसेनेकडून देण्यात आल्या. मुंबई विमानतळावर शिवसेना आणि रिपांईचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. कंगना राणावतला मुंबईत येण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे. तसंच कंगनाला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.

-------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont give too much importance to Kangana; Order to party spokesperson from Matoshri