लोकल सुरू करण्याची घाई नको! महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

लोकल सुरू करण्याची घाई नको! महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

मुंबई : दिवाळीनंतर लोकल सामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार, अशी चर्चा होती; मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सुरू करण्याची घाई नको, अशी परखड भूमिका मांडली आहे.  

दिल्लीत कोव्हिडची दुसरी लाट सुरू आहे, तर अहमदाबादमध्ये रुग्ण वाढू लागल्यामुळे कर्फ्यू लावण्यात आला आहे. मुंबईत कोव्हिड आता नियंत्रणात आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याची मागणी आता नोकरदारांकडून होऊ लागली आहे; मात्र महापौरांनी लोकल सुरू करणाची घाई करू नका, अशी भूमिका मांडली आहे. दिवाळी झाली आहे. त्याचबरोबर थंडीत कोव्हिड पसरण्याचा अधिक धोका आहे. मुंबईची परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र अद्याप कोव्हिड संपलेला नाही. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करता लोकल सुरू करणे योग्य नाही, असेही महापौरांनी नमूद केले. 

मास्क वापरा; स्वच्छता बाळगा! 
कोव्हिड नियंत्रणात आहे; मात्र पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे महापौरांनी सांगितले. काही नागरिक आजही मास्क न लावता फिरत आहेत. सर्वांनी मास्क वापरलेच पाहिजे. तसेच वैयक्तिक स्वच्छता राखून सुरक्षित अंतर राखायला हवे, असेही महापौरांनी सांगितले. 

Dont rush to start local Role of Mayor Kishori Pednekar

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com