esakal | तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई

घाटकोपरमधून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली असून, सद्दाम आबुल हुसैन (25), रमजान अली नजीर अली (23), इकबाल नूर हुसैन (23) अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. 

तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई

sakal_logo
By
निलेश मोरे

घाटकोपर (बातमीदार) : घाटकोपरमधून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली असून, सद्दाम आबुल हुसैन (25), रमजान अली नजीर अली (23), इकबाल नूर हुसैन (23) अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. 

खैरपाडा गावात 10 दिवसांत 5 जणांचा मृत्यू! आरोग्य यंत्रणेत संभ्रम, ग्रामस्थ भीतीच्या छायेत

"आईज ऍण्ड इयर' या गोपनीय सूत्रांकडून एटीएसला याबाबत माहिती मिळाली होती, की सद्‌भावना बिल्डिंग, वामन मास्तर वाडी, नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्‍चिम) या भागात काही बांगलादेशी नागरिक येणार आहेत. त्याअनुषंगाने एटीएस अधिकारी रामकृष्ण बोडके यांनी आपल्या पथकासह सापळा लावून एका संशयित बांगलादेशी नागरिकास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात नेत त्याची चौकशी करण्यात आली. या वेळी प्रथमत: त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. या वेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, त्यात काही बांगलादेशी कोड असलेले मोबाईल क्रमांक मिळाले. याबाबत सखोल चौकशी केली असता या व्यक्तीने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांनीही चौकशीत बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. 

ठाणेः ई चलन न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई, वाहतूक शाखेचा इशारा

छुप्या मार्गाने भारतात प्रवेश 
कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेनापूर येथून बांगलादेश-भारत सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला. त्यानंतर हावडा स्थानकावरून रेल्वेने प्रवास केला, अशी कबुलीही या तिघांनी दिली. घाटकोपर पोलिसांनी या तिघांविरोधात कलम- 3 सह 6, पारपत्र (भारतात प्रवेश) 1950, सह परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 भारतीय नागरिक कायदा 1946 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image
go to top