‘रोल्टा’च्या आगीतून संशयाचा धूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अंधेरीतील बंद कंपनीच्या आगीच्या चौकशीची स्थानिकांची मागणी

मुंबई : मरोळ एमआयडीसीतील रोल्टा टेक्‍नॉलॉजी आयटी कंपनीला गुरुवारी लागलेल्या आगीच्या घटनेमुळे औद्योगिक परिसरात स्थानिकांचा गोंधळ उडाला होता. रोल्टा कंपनी दोन वर्षे बंद असताना आग नेमकी कशी लागली, असा प्रश्‍न उपस्थित करत या आगीची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मोठी बातमी अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?  

रोल्टा कंपनी तोट्यात असल्यामुळे गेली दोन वर्षे बंद अवस्थेत आहे. तळमजल्यावर युनियन बॅंक ऑफ इंडिया कार्यरत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांना वारंवार आग का लागते? कंपनी बंद असल्यामुळे वीज पुरवठादेखील खंडित करण्यात आला होता, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्‍यताही कमीच आहे. वीज बंद असताना आग कशी लागते याची चौकशी महानगरपालिका आणि सरकारने केली पाहिजे. या इमारतीला आग लागली, की आग लावण्यात आली, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आगीची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

महत्वाची बातमी चाणक्य कोण आहे, यावर अमित शहा म्हणतात...

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याचे कळताच कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. त्या वेळी तळमजल्यावर युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून कंपनीतील महत्त्वाच्या वस्तू खाक झाल्या आहेत.
- नुरूल चौधरी
, प्रत्यक्षदर्शी

हे सुद्धा वाचा टीएमटीच्या बस भाडेवाढीच्या दिशेने

रोल्टा कंपनीला सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली. इमारत बंद असताना ही आग लागली कशी, याची चौकशी करण्यात यावी. हा संपूर्ण परिसर एमआयडीसीअंतर्गत येतो. याबाबत आम्ही एमआयडीसी विभाग आणि पोलिस प्रशासनाला पत्र देणार आहोत. इमारतीला संपूर्ण काचेचे अच्छादन केल्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्‍यात आणण्यासाठी साडेपाच तास लागले.
- संदीप नाईक
, स्थानिक नगरसेवक

हे वाचलेय का... पश्चिम महाराष्ट्राच्या उसाला रायगड जिल्ह्याचा आधार

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इमारतीमधून धूर येत असल्याचे दिसून आले. दुपारनंतर आगीचे प्रमाण वाढले; मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रोल्टा कंपनी बंद असल्याने वीजपुरवठाही खंडित केला होता. तरीदेखील आग कशी लागू शकते? महानगरपालिका आणि सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.
- अविनाश भागवत
, स्थानिक

doubt about 'Rolta' fire


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doubt about 'Rolta' fire