
नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्ब्यात दारूच्या नशेत खाकी वर्दीतील पोलीसानेच महिला प्रवाशांचा विनयभंग केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरारोड ते नायगाव दरम्यान आज शनिवार ता ०२ रोजी दुपारी ३ ते ३.२० च्या वेळेत लोकल मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. महिला डब्यातील खकीवर्दीतील पोलिसांचा महिलांनी एक व्हिडिओ ही काढला आहे.