कल्याणमधील उड्डाणपूल बंद झाल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

रविंद्र खरात
Thursday, 15 October 2020

 कल्याण पूर्वेकर पुलाच्या बाजूला असलेला अरुंद रस्ते आणि जीवघेणा पुलाच्या खालून वाहन चालक प्रवास करत आहेत. कल्याण पूर्वेकरांचा वनवास कधी संपणार, कल्याण पूर्वेला नागरिक राहतात जनावरे नाही? असा संतप्त सवाल कल्याण पूर्वे कडे राहणारे नागरिक करताहेत.

मुंबईः  कल्याण पूर्वेला जाणारा स्वर्गीय आनंद दिघे पूल वाहतुकीला बंद केला आहे. कल्याण पूर्वेकर पुलाच्या बाजूला असलेला अरुंद रस्ते आणि जीवघेणा पुलाच्या खालून वाहन चालक प्रवास करत आहेत. कल्याण पूर्वेकरांचा वनवास कधी संपणार, कल्याण पूर्वेला नागरिक राहतात जनावरे नाही? असा संतप्त सवाल कल्याण पूर्वे कडे राहणारे नागरिक करताहेत.

कल्याण पूर्वे आणि पश्चिमेला जोडणारा पत्रीपुल काम मागील 2 वर्ष काम रखडले असून धीम्या गतीने काम सुरू असल्याने कल्याण पूर्व मधून पश्चिमेला येताना वाहतूक कोंडीच्या मोठ्या मानसिक तणावात प्रवास करावा लागत आहे. त्यातच कल्याण पूर्वेला पर्याय असलेल्या वालधुनी मार्गे स्वर्गीय आनंद दिघे उड्डाण पूल होता. मात्र स्वर्गीय आनंद दिघेकडे जाणारा रस्ता सिमेंटचा रस्ता बनविण्यासाठी घेतला आणि तेथील रस्ता बंद केल्याने कल्याण पूर्वेकडील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहे. 

अधिक वाचाः  कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिलं पोस्ट कोविड सेंटर ठाण्यात

पूर्ण उल्हासनगरला वळसा घालून जाण्याऐवजी एफ केबीन आणि स्वर्गीय आनंद दिघे उड्डाण पुलाच्या खालील एका जीवघेणा पुला खालून वाहन चालकांनी आपला प्रवास सुरु केला. त्या बोगद्यात पावसाचे पाणी साचले असून आजू बाजूला चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून वाहन चालक रात्रीचा काळोख्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. एकीकडे दिवसा पत्रीपुलाच्या वाहतूक कोंडीने त्रस्त तर रात्री एफ केबिन लोक वस्तीमधून होणारी वाहनाच्या लांबलचक रांगा यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका ही वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अधिक वाचाः  विधानपरिषद नियुक्तीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी, चार नावे कुणाची?

कल्याण पूर्वेला नागरिक राहत नसून जनावरे राहत नाही, कल्याण पूर्वेला कोणी वाली नाही म्हणून पालिका वाटेल तसा निर्णय घेत असल्याचा आरोप कल्याण पूर्व मधील जाणीव सामाजिक संस्था अध्यक्ष प्रथेमश सावंत यांनी केला आहे.15 दिवसात तोडगा काढला नाही तर जनआंदोलन करू असा इशारा सावंत यांनी दिला आहे. तर पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वाहतूक पोलिस यांच्याशी संपर्क साधून नागरिकांना कमी त्रास होईल असे पर्याय देत असून जेथे रस्ता बनत आहे त्या ठेकेदाराला एक लाईन रस्ता लवकर बनवा अश्या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Due close Anand Dighe flyover Kalyan East Citizens have suffer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due close Anand Dighe flyover Kalyan East Citizens have suffer