पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील ६६७० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालकासह दोन मूल्यांकन तज्ज्ञांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. १२) अटक केली. न्यायालयाने या तिघांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील ६६७० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालकासह दोन मूल्यांकन तज्ज्ञांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. १२) अटक केली. न्यायालयाने या तिघांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता १५ वर पोहोचली आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या दहशतीमुळे ...ही निवडणूक ढकलली पुढे!

पीएमसी बॅंकेचा माजी संचालक जसबिंदर सिंग बनवैत याला ठाण्यातून; तर विश्‍वनाथ प्रभू व श्रीपाद जेरे या मूल्यांकन तज्ज्ञांना मुंबईतून अटक करण्यात आली. बनवैत याने या गैरव्यवहाराची माहिती असूनही दुर्लक्ष केले, तर प्रभू व जेरे यांनी एचडीआयएलच्या सात मालमत्तांचे चढ्या भावाने मूल्यांकन केले. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार एचडीआयएल मोठ्या कर्जासाठी पात्र ठरली. पीएमसी बॅंकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या रकमेपैकी ७३ टक्के कर्ज एचडीआयएलला देण्यात आले होते. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे अडलंय हापूसचं  घोडं, वाचा काय झालंय... 

रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे ६६७० कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार केली होती. पीएमसी बॅंकेचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या जबाबातून कर्ज देण्यात अनियमितता असल्याचे उघड झाले होते. ही अनियमितता २००८ नंतर दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान ईओडब्ल्यूपुढे आहे. कलम क्र. ४२०, ४०६, ४०९ (सरकारी अधिकाऱ्याकडून विश्‍वासघात), ४६५ (बनावटीकरण), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटीकरण) व १२०(ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला. मनी लाँडरिंगचे पुरावे मिळाल्यामुळे ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी वाचली का? म्हणून पालीत शुकशुकाट

असमाधानकारक उत्तरे
जसबिंदरसिंग बनवैत पीएमसी बॅंकेच्या कर्ज समितीचा सदस्य होता. तो २००५ ते २०१० दरम्यान बॅंकेच्या गुंतवणूक समितीवर आणि २०१० ते २०२० दरम्यान कार्यकारी समितीवर होता. पीएमसी बॅंकेने एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे अखेर त्याला अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested in connection with PMC Bank misconduct