कोरोनाचा डंख; AC, TV, फ्रिज आणि स्मार्टफोन एवढ्याने महागणार..

कोरोनाचा डंख; AC, TV, फ्रिज आणि स्मार्टफोन एवढ्याने महागणार..

मुंबई - येत्या काळात तुम्ही टीव्ही, फ्रिज,  AC किंवा स्मार्टफोन विकत घ्यायचा विचार करत असाल तर आता तुम्हाला कोरोनाचा डंख लागू शकतो. टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन किंवा AC यांचे बरेचसे पार्ट हे चीन मधून आयात केले जातात. अशात चीनमध्ये कोरोनाच्या हाहाकाराने अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागलाय. अशात कोरोनामुळे घरगुती वापराच्या वस्तूंच्या किमतीत या महिना अखेरपर्यंत वाढ होऊ शकते.

या क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते अनेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या प्रोमोशनल ऑफर्स बंद करतेय. यामुळे वस्तूंच्या किमती मध्ये 3 ते 5 टक्क्यांची वाढ होऊ शकते. टीव्ही सारख्या वस्तूंच्या महत्त्वाच्या पॅनलच्या किमती आधीच 10 ते 15 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. अशात यामध्ये आणखीन 7 ते 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

आयफोनच्या विक्रीवर मोठा परिणाम

आयफोनचं मोठ्या प्रमाणात चीनमध्ये उत्पादन होतं. चीनमधील कोरोना व्हायरसमुळे आयफोन उत्पादनाची गती मंदावली आहे. म्हणूनच कंपन्यांनी 'रिव्हाईज्ड इन्व्हेस्टर गायडन्स' जारी केलेला आहे. यामध्ये पुढील एक महिनाभरपर्यंत भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या आयफोनची संख्या कमी असणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. एका रिटेलरच्या माहितीनुसार आयफोनउत्पादनाच्या संथ गतीमुळे येते काही दिवस इ-कॉमर्स वेबसाईट्स आणि दुकानांमधील ऑफर्स देखील बंद केल्या जाणार आहेत.

सेल्स स्पोर्ट कमी करणार : 

डायकन या AC कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, कंपनीकडून सेल्स सपोर्ट कमी करण्यात येणार असून कंपनीच्या उत्पादनांमध्ये 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. सेल्स सपोर्टच्या स्पोर्टच्या माध्यमातून कंपन्या डिस्कउंटस देत असतात. गेल्या काही दिवसांपासून मलेशिया आणि थायलंडमध्ये देखील उत्पादनांचा सप्लाय कमी होत असल्याने आता कंपनीने आपल्या उत्पादनाच्या किमती 3 ते 5 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

3 ते 5 टक्के भाववाढ निश्चित :

गोदरेज कंपनीचे बिझनेस हेड कमल नंदी यांच्या माहितीनुसार येत्या काळात 3 ते 5 टक्के भाववाढ निश्चित आहे. चीन वरून येणारे consignment भारतात पोहोचायला प्रचंड विलंब होतोय. अशात येत्या काळात दरवाढ निश्चित मानली जातेय असं देखील त्यांनी म्हंटलंय.

due to corona virus prices of tv ac fridge and smart phone will increase

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com