मुंबईची लाईफलाईन ३१ मार्चपर्यंत बंद ! मुंबईची टोटल लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

आज मध्यरात्रीपासून (२३ मार्च रात्री १२.०० पासून ) मुंबईतील लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहे.

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबईसाठी मोठा निर्णय घेलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घेतलेला निर्णय ऐतिहासिक असा मनाला जातोय. मुंबईत लोकलमुळे होणारी गर्दी प्रचंड असते. अशात कोरोना ज्या वेगाने आपले हातपास पसरतोय त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय.

आज मध्यरात्रीपासून (२३ मार्च रात्री १२.०० पासून ) मुंबईतील लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी देखील मुंबईतील लोकल धावणार नाही. मुंबईमधील लोकलमधून सर्वात जास्त नागरिक दररोज प्रवास करत असतात. अशात सरकारकडून वारंवार सांगून देखील देखील मुंबईकरांनी लोकलमधून प्रवास करणं बंद केलं नव्हतं. म्हणूनच मुंबई लोकल्स यांना कोरोना बॉम्ब देखील बोललं जात होतं. म्हणूनच रेल्वे मंत्रालयाकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णय घेतला गेलाय. मुंबईची टोटल लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल आता सुरु झालीये. 

चिंताजनक ! महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

लोकल बंद करण्याबाबत काय म्हणालेत मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार 

  • महाराष्ट्र सरकारकडून वारंवार केंद्राशी लोकल ट्रेन बंद करण्यासंदर्भात चर्चा केली जात होती. 
  • कोरोनाचा मुंबईतील वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राकडून घेतलेला मोठा निर्णय 
  • हा राष्ट्रीय स्तरावर घेतलेला मोठा निर्णय आहे, हा निर्णय केंद्राने राज्य सरकारला  विश्वासात घेऊनच घेतलेला निर्णय आहे 
  • आज मध्यरात्रीपासून पॅसेंजर एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन पूर्णतः बंद राहणार
  • २३ मार्च रात्री १२ वजेपासून ते ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत सर्व ट्रेन्स आणि मुंबईतील लोकल ट्रेन्स बंद राहणार आहेत 
  • या निर्णयातून मालगाड्याना वगळण्यात आलंय 
  • अत्यावश्यक सेवांसाठी देखील लोकल धावणार नाहीत 
  • लांब पल्यांच्या गाड्या, मेल ट्रेन्स, एक्स्प्रेस ट्रेन्स, सुपरफास्ट ट्रेन्स, मेमो, डेमो ट्रेन बंद राहणार 
  • ३१ मार्चपर्यन्त सर्व प्रवासी वाहतूक बंद राहणार 

मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय का, महाराष्ट्र स्टेज २ वरून स्टेज ३ वर जातोय का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यास आता नक्कीच वाव निर्माण होतोय. कारण महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढलीये. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात आणखी १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केवळ कोरोनाबाधितांचा आकडा वाढत नाहीये तर महाराष्ट्रात आज कोरोनामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूचा आकडा २ वर गेलाय. 

due to corona virus threat mumbai local trains to remain close till 31st march midnight 

कोरोना व्हायरस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corona virus threat mumbai local trains to remain close till 31st march midnight