...नाहीतर आमच्या बोटीपण समुद्रात उतरतील, उन्नतच्या मच्छिमारांनी 'का' दिलाय इशारा

...नाहीतर आमच्या बोटीपण समुद्रात उतरतील, उन्नतच्या मच्छिमारांनी 'का' दिलाय इशारा
Updated on

मुंबई, विरार : राज्यात मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै असा आहे. या बंदी कालावधीत मासेमारी केल्यास संबंधित संस्था, सभासदांवर कारवाई करून त्यांचा डिझेल कोटा बंद करण्यात येईल, असा इशारा देऊनही पश्चिम किनारपट्टीवर बेकायदा मासेमारी सुरु आहे. अशी तक्रार अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.  

मोठी बातमी - कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे
 
पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून पावसाळ्यात विना परवाना आणि बंदी आदेश धुडकावून सर्रास मासेमारी केली जात आहे. या बोटींकडे कुठल्याही प्रकारची कागद पत्रे, परवाना नसून याबाबत फिशरीस परवाना अधिकारी व आयुक्त यांना कळवले आहे. या बेकायदा मासेमारीमुळे उत्तनमधील मच्छीमार संस्थेला जाब विचारत आहेत.

एकतर अनधिकृत मासेमारी थांबवा, अन्यथा आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी ते करत आहेत. बेकायदा बोटी तत्काळ बंद न केल्यास आम्ही सुद्धा आमच्या बोटी समुद्रात उतरवू, असा इशारा उत्तनच्या मच्छीमारांनी दिला आहे. त्यामुळे आता  फिशरीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून याची बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटी ताब्यात घेऊन साहित्य जप्त करावे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी डिमेलो यांनी पत्राद्वारे केली आहे.

due to illegal fishing fishermen in unnat are aggressive read what are their demand

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com