रायगड आणि कोकणात विध्वंस घडवणारा 'निसर्ग' मुंबईला मात्र पावतोय, वाचा काय होतंय...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

निसर्ग वादळाच्या प्रभावामुळे आजही मुंबई परीसरात समुद्रावरुन नेहमीपेक्षा वेगाने वारे वाहात आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुक वाढली तरी प्रदुषणाची पातळी वाढलेली नाही.

मुंबई : निसर्ग वादळाच्या प्रभावामुळे आजही मुंबई परीसरात समुद्रावरुन नेहमीपेक्षा वेगाने वारे वाहात आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुक वाढली तरी प्रदुषणाची पातळी वाढलेली नाही. हे वारे हवेतील प्रदुषके वाहून नेत असल्याने प्रदुषण वाढलेले नाही. मात्र, येत्या दोन चार दिवसात वाढलेल्या वाहतूकीचा प्रदूषणावरील परिणाम दिसायला सुरवात होईल. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत वाहानांची वर्दळ नगण्य असल्याने हवेचा दर्जा चागलाच सुधारला होता. सलग दोन महिने हवेतील प्रदुषकांचे प्रमाणात सरासरीच्या 30 टक्क्यांहून कमी झाले होते.

31 मे रोजी मुंबईच्या प्रत्येक घनमिटर हवेत तरंगते धुलिकण (पीएम 2.5) 37 मायक्रोग्रॅम इतके होते. तर सोमवारी हे प्रमाण 28 मायक्रोग्रॅम नोंदविण्यात आले आहे. भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या सफर उपक्रमाअंतर्गत ही प्रदुषणाची पातळी नोंदविण्यात आली.

मोठी बातमी - 2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल...

माझगावमध्ये प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. 31 मे रोजी माझगाव येथे पी.एम.2.5 चे प्रमाण 7 मायक्रोग्रॅम होते. हे आतापर्यंतचे सर्वात कमी प्रमाण असल्याची शक्यता आहे. सोमवारी हे प्रमाण 31 मायक्रोग्रॅम एवढे आहे. तर नवीमुंबईतील प्रदुषणाच्या पातळीत फक्त 1 एककाने वाढ झाली आहे.

निसर्ग वादळाच्या प्रभावामुळे  मुंबई परीसरात समुद्राकडून वारे वाहत असल्याने त्यांचा वेग जास्त आहे. त्यामुळे हवेतील प्रदुषके वाहून जात आहेत‍‍. सफरचे प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी याबाबत माहिती दिली. येत्या दोन तीन दिवसात वाढलेल्या वाहतूकीते परीणाम हवेतील गुणवत्तेवर दिसू लागतील असेही डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले. मुंबईत जून महिन्यात ताशी  18 ते 22 किलोमिटर वेगावे वारे वाहातात. तर सोमवारी 24 किलोमिटर वेगाने वारेे वाहत होते. 

मोठी बातमी - ​कुठे बस पडली बंद तर कुठे सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी; मुंबईकर म्हणतायत हे काही 'बेस्ट' नाही... 

हवेतील पी.एम 2.5 चे प्रमाण (प्रति घनमीटर हवेत मायक्रोग्रॅम)

 • ठिकाण ----31 मे ----- 8 जुन 
 • मुंबई सरासरी --37 ----28
 • भांडुप ---28---13
 • कुलाबा ---20---17
 • मालाड --35---28
 • माझगाव --7---31
 • वरळी --31---13
 • बोरिवली --52---31
 • बीकेसी --- आकडे उपलब्ध नाहीत---50
 • चेंबूर -- आकडे उपलब्ध नाहीत  ----- 15
 • अंधेरी ----35--- 33
 • नवी मुंबई ---19--- 20

due to nisarga cyclone mumbais air quality is very good even after rise in traffic


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to nisarga cyclone mumbais air quality is very good even after rise in traffic