सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

सुशांतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्याप कोणीही सावरलं नाही आहे. सुशांतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबई  : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला.  सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्याप कोणीही सावरलं नाही आहे. सुशांतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचं कुटुंब अजून सावरलं नाही आहे. अशातच सुशांतच्या कुटुंबाला आणखी एक धक्का सहन करावा लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त त्याची वहिनी सुधा देवी (भाभी) सहन करु शकल्या नाहीत आणि या धक्क्यात असताना त्यांचा मृत्यू झाला. 

नक्की वाचावातावरण बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली; यावर डॉक्टर म्हणतात...

सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार होत असताना सुधा देवी यांचं बिहारमध्ये निधन झालं. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच सुधा देवी यांनी खाणंपिणं सोडलं होतं. त्या सुशांतचं गाव पूर्णियाच्या मलाडीहा येथे राहायच्या. सुधा देवी या सुशांतच्या चुलत भावाच्या पत्नी होत्या. सुशांतसिंग राजपूत हा आपल्या कुटुंबियांच्या खूप जवळ होता. सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांनाही जेव्हा एका फोन कॉलवरुन त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा ते देखील धक्क्यातून स्वतःला सावरु शकले नाहीत. मुंबईत येण्यापूर्वी त्यांचीही परिस्थिती खालावली होती. 

हे ही वाचा : कोरोना काळात केलं लग्न पण अवघ्या तीन दिवसातच झालं असं काही...बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

तसंच गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या सुधा देवी यांचीही प्रकृती चिंताजनक झाली. सुशांतबद्दल समजताच त्या सारख्या सारख्या बेशुद्ध होऊ लागल्या. नातेवाईकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांना डॉक्टरांनाही दाखवलं. पण त्या स्वतःला धक्क्यातून सावरु शकल्या नाहीत.  असं सांगण्यात आलं की, शेवटपर्यंत सुधा देवी या सुशांतबद्दलचं विचारत होत्या. तो कसा आहे? तो बरा आहे का? पण घरात एवढ्या लोकांची गर्दी पाहिली तेव्हा त्यांना समजलं की काहीतरी झालं आहे. तेव्हाच त्या बेशुद्ध पडल्या. 

हे वाचलंत काकाँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

सुधा देवी यांचे पती आणि सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्र सिंग म्हणाले की, सोमवारी सकाळपासूनच सुधा देवीची प्रकृती चिंताजनकच होती. संध्याकाळी 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरेंद्र सिंह देखील या घटनेनंतर स्वतःला सावरु शकले नाहीत. त्यानंतर रडत रडत त्यांनी म्हटलं की, आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नीही गेली. आता मी कसा जगू? बिहारमधील पूर्णिया हे सुशांतचं मूळ गाव आणि पाटण्यातील राजीव नाझर भागातील मालडिहा हे सुशांतच्या आईचं मूळ गाव आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी समजताच लोकांना आपले अश्रु अनावर झाले. सुशांतच्या बालपणाच्या आठवणी या दोन्ही गावात जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्या खगडियामध्ये असलेल्या ननिहालमध्येही शोकाचे वातावरण आहे.

Another thing of sorrow on the family of Sushant Singh Rajput entertainment news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another thing of sorrow on the family of Sushant Singh Rajput entertainment news