esakal | डम्पिंग ग्राऊंडची समस्या सुटली : खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डम्पिंग ग्राऊंडची समस्या सुटली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथ (Ambarnath) शहरातील (City) कचरा आरक्षण क्रमांक १३२ येथे टाकण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परवानगी दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चिखलोली येथील डम्पिंग (Dumping) ग्राऊंडमधून होणाऱ्या धुराच्या आणि दुर्गंधीच्या त्रासापासून परिसरातील नागरिकांची सुटका झाली आहे.

अंबरनाथच्या चिखलोली येथील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली होती. तसेच त्यातून निघणाऱ्या धूर आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. डम्पिंग ग्राऊंड हटवण्याचा मागणीवरून अनेकदा मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आरक्षण १३२ या ठिकाणी कचरा टाकण्याची परवानगी दिली.

यानंतर अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, बदलापूरचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, आरोग्यधिकारी सुरेश पाटील आदींनी डंपिंग ग्राऊंडच्या नवीन जागेची पाहणी केली. येत्या काही दिवसांत अंबरनाथला रोज जमा होणारा कचरा आरक्षण क्रमांक १३२ या ठिकाणी टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा: अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षाची धारधार शस्त्रांनी हत्या, चारही आरोपी अटकेत

संयुक्त घनकचरा प्रकल्प

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अंबरनाथ आणि बदलापूरचा संयुक्त घनकचरा प्रकल्पदेखील येत्या काही महिन्यांत त्याच जागी राबवण्यात येणार असून त्यासाठी एमएमआरडीएने १४४ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे.

loading image
go to top