

Duplicate Gyanesh Kumar In Garjana Morcha
ESakal
मुंबई : ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात सहभागी होण्यासाठी डोंबिवली, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच मनसेचे पदाधिकारी एकत्रित येत यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘संविधान बचाव, देश बचाव’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला जात असून मनसैनिकांनी थेट डुप्लिकेट ज्ञानेश कुमारांनाच बांधून आणल्याचे समोर आले आहे.