दारू काय काय करायला लावते बघा, शेवटी पोलिसांनी पकडलंच... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

मद्यासाठी कल्याण येथून उरणपर्यंत रुग्णवाहिकेतून प्रवास, पोलिसांच्या सतर्कतेमुळे

नवी मुंबई : कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आहे. त्यामुळे मद्यपींची पंचायत झाली असून अनेक जण मद्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. कल्याण येथील एका तरुणाने तर गुरुवारी ९ तारखेला  मध्यरात्री रुग्णवाहिकेतून चक्क उरण गाठले. पण, त्याची ही योजना कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे फसली. तो आता सहकाऱ्यासह पोलिस कोठडीची हवा खात आहे. 

COVID19 :  सध्या जगात मागणी असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे तरी काय ?

लॉकडाऊनमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळून बार, पब्स, वाईन शॉप बंद करण्याचे सक्त आदेश आले आहेत. त्यामुळे दारूच्या दुकानांसह बार, पब, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मद्यपी छुप्या पद्धतीने चढ्या भावात मद्य खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण तर मद्यासाठी अजब क्‍लृफ्त्या आजमावत आहेत. कल्याणच्या खिडकाळी भागात राहणाऱ्या एकनाथ खवणे (24) या तरुणा उरण येथे रहाणाऱ्या मित्राने मद्य देण्याचे आश्वासन दिले होते. 

मोठी बातमी - पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी, वय होतं अवघे....

त्यामुळे पोलिसांना चकवा देण्यासाठी तो चक्क रुग्णवाहिकेतून मध्यरात्री सहकारी गणेश वायकर (36) याच्यासह उरण येथे गेला. तो उरणमध्ये संशयास्पदरित्या फिरत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांना निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी एकनाथची चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने उरण येथे मित्राकडे मद्य घेण्यासाठी आल्याचे सांगितले. 

रुग्णवाहिकेचा वापर अत्यावश्‍यक सेवेसाठी न करता बेकायदेशीर कामासाठी केल्याचे आढळून आल्याने उरण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातील रुग्णवाहिका जप्त केली आहे.

during lockdown two people traveled from kalyan to uran through ambulance 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during lockdown two people traveled from kalyan to uran through ambulance