मोठी बातमी - पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी, वय होतं अवघे....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

खारघरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 33 वर्षीय रिक्षा चालकाचा शुक्रवारी (ता.10) मृत्यू झाला. या रुग्णाला 4 दिवसापूर्वी त्याच्या नातेवाईकांनी नवी मुंबईमधील रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत कोरोनासोबत डेंग्यूचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले होते.

पनवेल : खारघरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 33 वर्षीय रिक्षा चालकाचा शुक्रवारी (ता.10) मृत्यू झाला. या रुग्णाला 4 दिवसापूर्वी त्याच्या नातेवाईकांनी नवी मुंबईमधील रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत कोरोनासोबत डेंग्यूचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले होते.

पनवेल पालिका हद्दीत सापडलेल्या 16 रुग्णांमध्ये खारघरमधील 4 रुग्णांचा समावेश आहे. पनवेलमधील हा कोरोनाचा पहिला बळी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता वैद्यकीय विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली.

वरळी कोळीवाड्यातील 14 हजार कुटुंबांना मदत 

वेदांता लिमिटेड या तेल, वायू आणि धातू कंपनीने वरळी कोळीवाड्यातील 14 हजार कुटुंबांना महिनाभराचे धान्य दिले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा परिसर गेल्या आठवड्यापासून सील करण्यात आला आहे. तेथील परिस्थिती पाहून मच्छीमार कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा सामना करण्यासाठी उद्योगांनी सरकारला पाठबळ देणे महत्त्वाचे आहे, असे वेदांता रिसोर्सेसचे कार्यकारी अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचं काय आहे 'मिशन धारावी'? 

Inside Story : गेल्या २० वर्षांत 'या' ३ व्हायरसमुळे जगात आली महामारी

धक्कादायक ! पालिका आणि पोलिसांमध्ये भांडण, दीड तास मृत व्यक्ती रस्त्यावरच पडून...

मुंबईतील धारावीत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, यातील दोघांचं तबलीकी कनेक्शन

first corona death reported from panvel read full story

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first corona death reported from panvel read full story