esakal | COVID19 : सध्या जगात मागणी असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

COVID19 : सध्या जगात मागणी असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे तरी काय ?

कोरोनावर उपचारांसाठी सध्या जगभरात डॉक्टरांकडून निरनिराळ्या प्रकारची औषधं दिली जातायत. मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधामुळे कोरोनाचे बहुतांश रुग्ण बरे होतात असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

COVID19 : सध्या जगात मागणी असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे तरी काय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या कोरोनाचा कहर जगभरात पाहायला मिळतो आहे. जगात १५ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अजूनही कोरोनावर औषध सापडलं नाहीये. कोरोनावर उपचारांसाठी सध्या जगभरात डॉक्टरांकडून निरनिराळ्या प्रकारची औषधं दिली जातायत. मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधामुळे कोरोनाचे बहुतांश रुग्ण बरे होतात असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध फक्त भारताकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील देशांनी  भारताकडे या औषधाची मागणी केली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या रुग्णांना दिल्यामुळे कोरोना बारा होऊ शकतो असं सध्या सगळ्यांना वाटत आहे. मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधामुळे या रोगाच्या एका विशिष्ट टप्प्यातच उपयोग होतो असं स्पस्ष्ट करण्यात आलंय. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे या औषधाची मागणी केल्यामुळे या औषधाचं  महत्व अजूनच वाढलं आहे.

Sakal Impact : कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस

सध्या भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीला कोरोनाच्या रूग्णांवर वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आणि ज्या रुग्णांना लक्षणं दिसून येत नाहीत अशा रुग्णांना या गोळ्या दिल्या जात आहेत.

काय आहे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन:

  • हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गोळ्या आहेत.
  • या गोळ्यांचा वापर रुग्णांची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली की केला जातो.
  • क्लोकोक्विन या गोळीच्या प्रजातीचं औषध आहे.
  • हे औषध मलेरियाच्या उवचारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतंय.
     

या औषधांबद्दल काय म्हणतात वैज्ञानिक:

या औषधामुळे शरीरात विषाणूंची जी संख्या वाढत जाते त्या प्रक्रियेला आळा घातला जातो. भारताच्या करोना प्रतिबंधक दलानं या औषधाचा वापर सध्याच्या परिस्थितीत मर्यादित पातळीवर करावा असं म्हंटलंय. वीस रूग्णांवरच्या उपचारात या औषधानं चांगले परिणाम दाखवले पण हे औषध अ‍ॅझिथ्रोमायसिन बरोबर वापरलं तरंच  परिणामकारक ठरू शकतं, असं फ्रान्समधल्या जर्नल ऑफ अँटीमायक्रोबियल जरनल महिला एका फ्रेंच वैज्ञानिकानं म्हंटलंय.

EXCLUSIVE :: अमिताभ गुप्तांवरील कारवाई थातूरमातूर! "AIS - D&A" नुसार निलंबन शक्य!

भारतात हे औषध कुठे तयार होतं:

भारताकडे या औषधाचा सर्वाधिक साठा आहे. मुंबईच्या आयपीसीए  लॅबोरेटरीजकडून या औषधाचं ८२ टक्के उत्पादन केलं जातं. अहमदाबाद येथील  कॅडिला  हेल्थकेअरकडून याचं ८ टक्के उत्पादन होतं. वॉलेस फार्मास्युटिकल्स
टॉरेंट फामॉस्युटिकल्स, ओव्हरसीज हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडून देखील या औषधाचं उत्पादन केलं जातं.

what is hydroxychloroquine and what is role of this medicine in covid 19

loading image
go to top