विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात धूळ, कचरा

File Photo
File Photo
Updated on

ठाणे : ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली लिफ्ट, भिंतीच्या प्लास्टरची पडझड, जागोजागी कोळिष्टके आणि कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असतानाच शैक्षणिक साहित्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे जाण्याचा सल्ला व्यवस्थापनाद्वारे दिला जातो. या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांनी समाजमाध्यमातून आवाज उठवला असून उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांना साकडे घातले आहे.

मुंबई विद्यापीठाचे ठाणे केंद्र हे ठाणे व त्यापुढील लाखो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या विद्यार्थ्यांचा मुंबईपर्यंतचा फेरा वाचावा, त्रास वाचावा, तसेच विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण व विविध अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत, या हेतूने ठाणे पालिकेने विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अत्यंत नाममात्र दरात बाळकुम, ढोकाळी येथील सुमारे 27 हजार चौरस मीटर जमीन विद्यापीठाला दिली. त्यानंतर 2014 मध्ये उपकेंद्र सुरू झाले. सद्यस्थितीत या ठाणे उपकेंद्रात एमबीए, बीबीए, एलएलबी व बीएमएस अभ्यासक्रम सुरू असून, 10 ते 12 डिस्टन्स लर्निंग कोर्सेसमध्ये सुमारे 350 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

 तरीही इथे पुरेसे शैक्षणिक साहित्य व पुस्तके उपलब्ध नसल्याचे समोर आले असून डिस्टन्स लर्निंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके मुंबई विद्यापीठात जाऊन घेण्यास सांगितले जात असल्याचा आरोप नागरे यांनी केला आहे. त्याचबरोबर उपकेंद्रातील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली असून जागोजागी कचरा, धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. वर्गातदेखील कचरा पसरलेला असतो, असे पाहणीदरम्यान आढळून आल्याचे नागरे यांनी सांगितले. तसेच, राज्याच्या उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

काही महिन्यांतच दुरवस्था 
काही महिन्यांपूर्वीच ठाणे उपकेंद्रातील गैरसोयीचा आढावा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी घेऊन तातडीने सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत उपकेंद्राच्या आणखी एका इमारतीसाठी महापालिकेकडून 20 कोटींच्या निधीचे आश्वासन मिळवले होते; तरीही पुन्हा काही महिन्यातच उपकेंद्राची दुरवस्था समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. 

Dust, garbage in Thane center of the Mumbai university

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com