कुर्ला रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांसाठी लवकरच ‘ही’ सुविधा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

मध्य रेल्वे प्रवाशांना ऍप आधारित ई-सायकल सेवा देणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून पहिल्यांदा कुर्ला स्थानकाबाहेर ई-सायकल ठेवण्यात येतील. या योजनेमुळे शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास रेल्वे अधिकार्यांनी व्यक्त केला.

मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांना ऍप आधारित ई-सायकल सेवा देणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून पहिल्यांदा कुर्ला स्थानकाबाहेर ई-सायकल ठेवण्यात येतील. या योजनेमुळे शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास रेल्वे अधिकार्यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचली का? मविआ सरकारला नकोय भाजपची‘ही’योजना! 

मध्य रेल्वेने पर्यावरण रक्षणासाठी ऑक्‍सिजन पार्लर, स्थानंकाच्या परिसरात रोपवाटिका आदी उपक्रम राबवले आहेत. आता प्रवाशांना ऍप आधारित प्रदूषणरहित ई-सायकल सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. कोणत्याही रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर प्रवाशांना ई-सायकलने इच्छितस्थळी जाता येईल. सुरुवातीला हा प्रकल्प कुर्ला स्थानकात सुरू होईल. मध्य रेल्वे ई-सायकल ठेवण्यासाठी ११५ चौरस मीटर जागा उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य स्थानकांतही ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? ससून डॉकचा मत्सव्यवसाय धोक्यात

भारतीय रेल्वेचा पहिला प्रयोग प्रदूषणरहित ऍप आधारित ई-सायकल सेवा सुरू होणारे कुर्ला हे भारतीय रेल्वेचे पहिले स्थानक ठरणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने कुर्ला स्थानकावरून ई-बस सुरू केल्या आहेत. त्यापाठोपाठ आता ई-सायकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? गड्या फिरायला आपला देशचा बरा

अशी असेल सेवा 
प्रवाशांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-सायकलवरील ‘क्‍यूआर’ कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर सायकलचा ताबा मिळेल. इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर जवळच्या सायकल हबमध्ये ई-सायकल ठेवता येईल. सायकल वापरल्याचे शुल्क ऍपच्या माध्यमातून कापले जातील. ई-सायकल वापरण्यासाठी १० मिनिटांना एक रुपया असे शुल्क आकारले जाण्याची शक्‍यता आहे. दिवसभरासाठी २० ते १०० रुपये आणि मासिक पाससाठी ३०० ते ५०० रुपये आकारले जातील. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ई-सायकलचे भाडे निश्‍चित होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-bicycle for passengers arriving outside Kurla railway station soon!