

E-Coli Found in Railway Station Water
ESakal
मुंबई : देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटर कूलर लावण्यात आले आहे. मात्र मुंबईत याच वॉटर कूलरबाबत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील चार रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या वॉटर कुलरमध्ये जीवघेणा जिवाणू 'ई-कोलाय' आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.