परीक्षेबाबतचा संभ्रम दुर करण्यासाठी 'त्यांनी' केला थेट मुख्य न्यायमूर्तींना ई-मेल!

परीक्षांबाबतचा संभ्रम दुर करण्यासाठी 'त्याने' केला थेट मुख्य न्यायमूर्तींना ई-मेल!
परीक्षांबाबतचा संभ्रम दुर करण्यासाठी 'त्याने' केला थेट मुख्य न्यायमूर्तींना ई-मेल!
Updated on

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाल्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षा आणि भविष्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेमार्फत थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना ई-मेल पाठवला आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने सहा पानी ई-मेल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पाठवण्यात आला आहे. या ई-मेलची दखल घ्यावी आणि अंतिम वर्ष व पदव्युत्तर परीक्षांबाबत राज्य सरकारने स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी मागणी पत्ररूपी याचिकेत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे भविष्याबाबत निर्णय घेणे सोपे होईल आणि तणाव कमी होईल, असे याचिकेत म्हटले आहे.

परीक्षा घेतल्या आणि कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थी गैरहजर राहिल्यास नंतर परीक्षा देण्याची व्यवस्था असायला हवी, असे मत व्यक्त केले जात आहे. राज्य सरकार सध्या तरी परीक्षा घेण्यासाठी तयार नाही. राज्य सरकारने एका समितीची नियुक्ती केली असून, या परिस्थितीत काय करता येईल याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. संघटनेने विद्यापीठ अनुदान आयोगालाही (यूजीसी) ई-मेल पाठवला आहे. अंतिम परीक्षा कशी असावी आणि गुणांकनाचे स्वरूप कसे असावे, याबाबत यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.

अस्वस्थता, तणाव
राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये एकवाक्यता नाही. तंत्रशिक्षण, बार कौन्सिल, मेडिकल कौन्सिल आदी. शिखर संस्थांकडूनही ठोस निर्णय जाहीर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि तणावाचे वातावरण असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com