कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उभं राहतंय महाकाय असं काही, होणार सर्व रुग्णांना फायदा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

कोविड रुग्णांना प्राणवायू कमी पडू नये म्हणून महापालिका महाकाय साठवण क्षमता तयार करत आहे.

मुंबई : कोविड रुग्णांना प्राणवायू कमी पडू नये म्हणून महापालिका महाकाय साठवण क्षमता तयार करत आहे. रुग्णालये आणि कोविड आरोग्य केंद्रांमध्ये 2 लाख 8 हजार लिटर ऑक्सिजन साठवता येणार आहे. हे काम आता पुर्णत्वास आले असून ऑक्सिजन पुरवठा सुुुुरु होणार आहे. 20 केंंद्र आणि रुग्णालयांमध्ये 13 हजार किलो लिटर आणि 6 हजार किलो लिटरच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. तर 6 रुग्णालयात 1 हजार किलो लिटरच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मनुष्यबळ वाहतूक त्याच बरोबर इतर अडचणींवर मात करत महापालिकेने हे काम सुरु ठेवले होते.

मोठी बातमी चीनी उत्पादनावर बहिष्काराच्या आवाहनामुळे चीन सरकार चिंतीत; चीनी सरकारच्या अधिकृत मुखपत्रातून मांडली भूमिका 

कोविड विषाणू श्वसन यंत्रणा कमकुवत करत असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. तसेच रुग्णाना वेळीच ऑक्सिजन मिळाल्यास ते अत्यावस्थ होण्याची शक्यताही कमी होते.कोविड रुग्णांमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य केंद्रांंमध्ये ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 हजार किलो लिटर, 6 हजार किलो लिटर आणि 1 हजार किलोलिटरच्या टाक्या उभारण्यात येत आहे. त्याची सुरवात केंद्र आणि रुग्णालयाच्या परीसरात जागा निश्चित करण्यापासून ऑक्सिजन पुरवठा दारांचा शोध घेणे तसेच विविध परवानग्या मिळवणे अशा प्रकारची कामे करुन प्रत्यक्ष महाकाय टाकी बसवणे ऑक्सिजन बेड पर्यंत पोहचविण्याची यंत्रणा उभारणे अशी कामे करायची होती. त्यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत केली.

कुठे किती ऑक्सिजनच्या टाक्या : 

13 हजार किलो लिटरची प्रत्येकी एक टाकी :

वरळी एनएससीआय डोम, महालक्ष्मी रेसकोर्स, दहिसर टोल नाका, दहिसर बस आगार, मुलूंड येथील रिचर्डसन क्रूडास, गोरेगाव नेस्को, वांद्रे –कुर्ला संकुल, वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) त्याचबरोबर  नायर रुग्णालय, केईएम रुग्णालय  

6 हजार किलो लिटरची एक टाकी : 

टिळक रुग्णालय शीव, कस्तुरबा रुग्णालय, घाटकोपर राजावाडी रुग्णालय, कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय  

1  हजार किलो लिटरच्या टक्क्या : 

भगवती रुग्णालय - दोन टाक्या, शिवडी कुष्ठरोग उपचार रुग्णालय, धारावी नगरी आरोग्य केंद्र दोन टाक्या, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय- दोन टाक्या, कामाठीपुरा नेत्र रुग्णालय

मोठी बातमी नदीत टाकला लोहचुंबकाचा गळ आणि हाती लागला भारतीय गूढ खजिना....

जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोरेगावस्थित नेस्को कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी मिळून १०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सदेखील पुरवण्यात येत आहेत. हे सिलेडर हाताळणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे सोपे असते.

BMC is constructing huge oxygen tank amid corona virus for the hospitals and quarantine facilities


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC is constructing huge oxygen tank amid corona virus for the hospitals and quarantine facilities