

Panvel Eastern Entry Interchange For Navi Mumbai Airport
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर, पनवेल परिसरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे येत आहेत. विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प, "क्लोव्हर लीप", अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील सहा महिन्यांत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ₹८०० कोटींच्या निधीतून हे काम सुरू आहे.