Devendra Fadnavis : विधानसभेत सव्याज परतफेड : फडणवीस

महाराष्ट्रात अपेक्षेएवढे यश नसल्याची कबुली
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal

मुंबई : देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचे अभिनंदन करतानाच महाराष्ट्रात जागा कमी झाल्या असल्या तरी त्याची सव्याज परतफेड करण्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.युतीतील सर्व घटकपक्षांचे अन कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis
Dhule Crime News : 7 जणांना न्यायालयीन, तर 4 जणांना पोलिस कोठडी; शंभर-दीडशे जणांनी केला होता हल्ला

आज एक्स या सोशलमिडीयावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात ," पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले .त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत.

Devendra Fadnavis
Nashik News : चांदवडमध्ये नालेसफाई कागदावरच; प्रशासन म्हणते सफाई पूर्ण झाली, मग शहरात तुंबलेल्या गटारी कुठून आल्या?

मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !

इंडी आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.

संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com