वनविभागाची जमीन हडपली, त्यातून हायवे जाताच भरमसाठ मोबदला मिळवला; भाजप नेत्याला ईडीचा दणका, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ED Attach BJP Leader Property : सरकारच्या अखत्यारित असलेल्या वनविभागची जमीन स्वत:च्या नावावर करून नंतर ती हायवेला जाताच मोबदलाही मिळवला. त्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी आता भाजप नेत्याला ईडीने दणका दिला आहे.
ED Attaches BJP Leader Property Over Forest Land Grab Case

ED Attaches BJP Leader Property Over Forest Land Grab Case

Esakal

Updated on

नवी मुंबईत एका सरकारी जमिनीच्या प्रकरणात ईडीने कारवाई करत थेट भाजप नेत्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त केलीय. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वहाल इथली जमीन एकेकाळी सरकारी कागदपत्रांमध्ये वनविभागाच्या नावावर होती. पण या जमिनी अनधिकृतरित्या आपल्या नावे करून कोट्यवधींचा घोटाळा केला गेला. या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी आता चौकशी केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com